💥परभणी येथील वसमत रोडवरील संत तुकाराम महाविद्यालयात संजीवनी कृषी महोत्सव व प्रदर्शन संपन्न...!


💥कार्यक्रमास अर्थ राज्यमंत्री भागवतराव कराड व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची उपस्थिती💥  


परभणी (दि.११ मे २०२२) - परभणी येथील वसमत रोडवरील संत तुकाराम महाराज महाविद्यालयात दि.०६ मे २०२२ ते ०९ मे २०२२ या चार दिवसीय संजीवनी कृषी महोत्सव व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, या कृषी महोत्सवामध्ये कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्यामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा परभणी श्री. विजयकुमार लोखंडे आणि तालुका कृषी अधिकारी परभणी, श्री. प्रभाकर बनसावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दालन उभारणी करण्यात आली चार दिवसीय कार्यक्रमांमध्ये मंडळ कृषी अधिकारी पिंगळी श्री. विजयकुमार संघई यांनी नोडल अधिकारी म्हणून तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रमोद रेंगे आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी श्रीमती. स्वाती घोडके यांनी या चार दिवसात सर्व आत्मा एटीएम बीटीएम तसेच पिंगळी मंडळातील सर्व कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांच्या सहकार्याने दालनास भेट देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यास कृषी विभागातील वेगवेगळ्या योजना तसेच आत्मा गट नोंदणी व इतर योजनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले कृषी विभागाच्या या दालनात मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी तसेच भगिनींनी भेटी देऊन माहिती घेतली सर्व अधिकारी कर्मचारी आणि पत्रकार तसेच, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भारत सरकार नामदार श्री. भागवतराव कराड साहेब, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार श्री. रावसाहेब दानवे पाटील, महाराष्ट्र राज्य माजी कॅबिनेट पाणीपुरवठामंत्री श्री. बबनराव लोणीकर तथा विद्यमान आमदार, जिंतूर सेलू विधानसभेच्या आमदार मेघना दीदी बोर्डीकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील कुलगुरू डॉ. धवन सर, भाजपा महानगर अध्यक्ष आनंदराव भरोसे भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.कदम, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेशराव भुमरे, व इतर मान्यवर यांनी दालनातभेटी दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या