💥पुर्णा तालुक्यात रेती लिलावधारक/रेती तस्करांसह महसुल प्रशासनही सैराट नदीपात्रांची मिळून लावताय विल्हेवाट....!


💥तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रात रेती घाट लिलावधारक/रेती तस्करांचा जेसीबी मशीनचा वापर करीत रात्रंदिवस नग्न तांडव💥


पुर्णा (दि.०४ मे २०२२) - महसुल प्रशासनाने रेती घाट लिलावधारकांवर लादलेले तब्बल शेकडाभर नियम महसुल प्रशासनानेच अक्षरशः मोडीत काढीत रेती घाट लिलाव धारकांना पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नद्यांवर जेसीबी यंत्रांचा वापर करीत पर्यावरणासह कृषी क्षेत्राला धोका निर्माण करून दिवसरात्र दरोडा घालण्याची खुली सुट दिली की काय ? असा गंभीर प्रश्न जिल्ह्यातील जनमतातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसह जनसामान्यात उपस्थित होत असतांना महसुल प्रशासन कठोर कारवाई करण्याऐवजी रेती घाट लिलावधारक/रेती माफियांनी हात मिळवणी करीत अक्षरशः सैराट झाल्याचे चित्र पुर्णा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात झाल्याचे दिसत असून महसुल प्रशासनाची अवस्था 'तु कर वटवट मी आहे निगरगट्ट' या उत्की प्रमाणे झाल्याचे दिसत असून तालुक्यातील मौ.कानखेड येथील रेती घाट लिलावधारक अग्रवाल ट्रेडिंग कंपनी मालक अनिल मुन्नालाल अग्रवाल या लिलावधारकाने कानखेड येथील नदीपात्रात अक्षरशः धुमाकूळ घालीत जेसीबी मशीनच्या साहाय्याने निर्धारीत क्षेत्रासह अन्य क्षेत्रातही ठराविक रेती साठ्याच्या शेकडोपट रेतीचे उत्खनन करून त्या अवैध चोरट्या रेतीची शेकडो वाहनांतून विल्हेवाट लावून महसूल प्रशासनाला कोट्यावधी रुपयांचा चुना लावला असतांनाच पुन्हा या अग्रवाल ट्रेडिंग कंपनी मालक अनिल अग्रवाल याच्या नावे तालुक्यातील मौ.निळा येथील रेती घाट सुटल्यामुळे आता 'सोने पे सुहागा' अश्या पध्दतीने रेती घाट लिलावधारक अग्रवालने मौ.निळा येथील नदीपात्रात महसुल प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे मनुष्य बलाचा वापर न करता जेसीबी यंत्रांचा वापर करीत जिल्ह्यातील तात्पुरता विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींसह महसुल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून नदीपात्र खरडण्यास सुरूवात करून पर्यावरणासह कृषी उद्योगाला मुठमाती देण्यास सुरूवात केल्याचे दिसत असतांना एसडीएम सुधीर पाटील यांच्यासह तहसिलदार पल्लवी टेमकर व महसुल प्रशासनातील अन्य अधिकारी कर्मचारी मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत मौ.कानखेड,संदलापूर,पिंपळगाव बाळापूर,निळा,कान्हेगाव यासह सर्वच रेती लिलावधारकांना पुर्णा-गोदावरी नदीपात्रांमध्ये रात्रंदिवस नग्न तांडव करण्यास खुली सुट देत असल्याचे निदर्शनास येत असून तालुक्यातील यापुर्वी सुरू झालेल्या मौ.कानखेड,पिंपळगाव बाळापूर,संदलापूर येथील रेती घाटांची तात्काळ ईटीएसद्वारे मोजनी करून संबंधित रेती लिलावधारकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या