मुंबई-अदिलाबाद नंदिग्राम एक्सप्रेस मध्ये विसलेली बॅग अखेर प्रवाश्याच्या स्वाधीन....!


💥सदरील बॅगेत बहिणीच्या लग्नाचे नवीन कपडे व रोख रक्कम १००००/-असा एकूण मुद्देमाल होता💥

औरंगाबाद (दि.३१ मे २०२२) : मुंबई-अदिलाबाद नंदिग्राम एक्सप्रेस मध्ये विसलेली बॅग अखेर प्रवाश्याच्या स्वाधीन करण्यात आली असून सदरील बॅगेत बहिणीच्या लग्नाचे नवीन कपडे व रोख रक्कम १००००/-असा एकूण मुद्देमाल हा परत करण्यात आला.

खूप मेहनतीने कमविलेल्या पैश्यातून हे कपडे व रोख रक्कम जमा केली होती सदरील मुद्देमाल परत मिळाला ही बाब आयुष्यात कधीही विसरणार नाही असे त्या प्रवाश्याने म्हटले व रात्री देवगिरी एक्सप्रेस ने नांदेडला व तेथुन यवतमाळ ला जाईल असे सांगून धन्यवाद देत प्रवासी निघून गेला ठाणे ते नांदेड असा रेल्वे प्रवास करताना ही घटना घडली होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या