💥'कुणी पाणी देता का हो पाणी' ? संभाजीनगरच्या जनतेचा पाण्यासाठी आर्त टाहो...!


💥त्राही...त्राही...त्राहिमाम - व्यंकटेश कमळू 

संभाजीनगर शहरातील जनता पाण्यासाठी "कुणी पाणी देता का हो पाणी ?" असा आर्त टाहो फोडत आहेत,पण पाणी मिळत नाही अशी स्थिती आहे .शहराच्या पाणीपुरवठा योजने कडे, सरकार व महानगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे . शहराच्या काही भागात आठ दहा दिवसांत तर काही भागात पाच सहा दिवसातुन एकदा तरी पाणी पुरवठा होईल की नाही याचा भरवसा नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात पाणी मिळत नसल्याने लोकांनी जीवन जगावे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे .लोक पाण्याची वाट पाहून त्यांचा रोजगार ,धंदा ,नोकरी ला मुकावे लागेल अशी स्थिती आहे . पाण्यासाठी लोकांची मानसिकता बिघडण्यासारखी स्थिती आहे.लोक दिवस रात्र कुठे पाणी मिळेल का ? टँकर मिळेल का ? मोटार सायकल , कार मध्ये ही जार ,हंडे घेऊन पाण्यासाठी शोध घेत फिरत आहेत .अनेक जण पाण्यामुळे हे शहर सोडत आहेत . एकी कडे सूर्य आगओकत असतांना घामाघूम होत बायाबापड्या घुट भर पाण्या साठी दारोदार फिरत आहेत.

शिक्षण शिकायला आलेली पोर, 'कुठं चुकून औरंगाबाद ला आलो,काय पाप होत का पूर्वजन्मीच ' असं म्हणत स्टडी टाइम सोडून पाणी शोधत फिरत आहेत .यात चूक कोणाची आहे ? महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना सगळं समजून ही ते उचित व्यवस्था का उभी करीत नाहीत ? हा यक्ष प्रश्न घशाला कोरड पडलेल्या जनतेला पडला आहे .साधारण दोन दशका पूर्वी समांतर जलवाहिनी द्वारे पैठण च्या नाथसागरातून शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना आखली गेली होती, पण सत्ताधीश व अधिकारी यांच्या बेजबाबदार व भ्रस्ट संगनमताने ती योजना गुंडाळली गेली .कोर्ट कज्जे झाले .पण त्या योजनेचे थेंबभर पाणी देखील पैठण हुन पुढे सरकले नाही. शहराला लागलेला भ्रष्टचाराचा भस्मासुर  संपवल्या शिवाय पाणी शहराला मिळणार नाही हे नागरिकांनी एव्हाना ओळखले . राज्यात देवेन्द्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शहराचे मा. आमदार अतुल सावे यांनी नव्याने 1680 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी करून घेतली.या योजनेतून शहरात 52 नवीन पाण्याच्या टाक्या , त्यातील 273 कोटी अंतर्गत जलवाहिन्यांसाठी तर 254 कोटी जलशुद्धीकरण केंद्र व त्यापुढील जल वाहीनी साठी खर्च करून, विशिष्ट कालमर्यादा राखून उत्कृष्ट पध्दतीने ही योजना राबविण्यात यावी असे ठरले .मनपा च्या भ्रष्टाचारी अधिकारी वर्गाच्या संसर्गामुळे चांगल्या योजनेचे मातेरे होऊ नये म्हणून ही योजना सरकारी विभाग महाराष्ट्र जिवन प्राधिकरण मार्फत करण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेशीत केले.ह्या योजनेच्या कामाचे पूर्ण पैसे राज्य सरकारने देण्याचे निश्चित केले.एक रुपया ही मनपा ला खर्च करायचा नव्हता.पुढे राज्यात निवडणूक होऊन सत्ता बदल झाला.काँग्रेस व अबू आझमी च्या साथीने राज्यात ठाकरे सरकार विराजमान झाले,शहराचे दुर्दैव की काय कोण जाणे पण ही योजना च ठाकरे सरकारने रद्द केली , योजनेचे टेंडर स्थगित करण्यात आले आणि वेगात सुरु झालेल्या ह्या योजनेला ग्रहण लागले.शहर पाण्यासाठी व्याकुळ असतांना हा मोठा धक्कादायक प्रकार घडला.तेंव्हाच जनतेचा आक्रोश पाहून घाईघाईने पुन्हा ही योजना सुरू करू असे ठाकरे सरकारने सांगितले. जनतेच्या हिता साठी विशेषतः पाण्यासाठी तरी सरकार कडून राजकारण होऊ नये ही अपेक्षा असतांना इथे ही तेच ठाकरे सरकारने केले.ही योजनाच पूर्ण होणार नाही अशी खुंटी सरकारने मारली ती म्हणजे जिथे कामगारांचे पगार करण्यासाठी मनपा कडे पैसे नाही , मनपा चे स्वतःचे पैसे खर्च करण्याची क्षमता व उत्पन्न नाही त्यांना ह्या योजनेचे 30 टक्के रक्कम भरण्याची अट घातली .योजनेला मूलतः मंजुरी देणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनपाची आर्थिक ताकद नाही व योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी पूर्ण रक्कम देण्याचा दूरदर्शी निर्णय होता.विद्यमान सरकार ने त्याचे मातेरे केले.हे सरकार येऊन अडीच वर्षे पूर्ण होत आहेत पण काम करण्याच्या ईच्छा शक्ती अभावी व अनेक बाबींची पूर्तता करतांना होणाऱ्या दिरंगाई मुळे वेळेत पूर्ण होण शक्य नाही.वेळेचे नियोजन केले असते तर खूप काही झाले असते व जनतेला गोदावरी चे पाणी नियमितपणे पिण्यासाठी मिळाले असते.पैठणचे नाथ सागर अगदी जवळ असूनही संभाजीनगर शहर तहानलेले आहे ' धरण उशाला, कोरड घशाला ' अशी स्थिती आहे.राज्य सरकारने जर ही योजना करण्याची ईच्छा नाही अथवा पूर्ण पैसे देणार नाही असे पत्र दिल्यास तात्काळ ही योजना केंद्र सरकार कडून पूर्ण करून घेऊ असे केंद्रीय मंत्री डॉ.कराड यांनी सांगितले आहे.पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याची जबाबदारी महानगरपालिका व सरकार पार पाडण्यासाठी कसूर करीत आहे, संभाजीनगर च्या जनतेचा पाण्यासाठी ' जल आक्रोश ' वाढला आहे .गल्लो गल्ली, रस्त्यास्त्यावर , कॉलनी , मोहल्ले , सोसायट्यातून जनता पाण्यासाठी संतप्त आहे.एकी कडे उष्णतेची लाट असतांना जनतेच्या संतापाची लाट उसळली तर कोणीही रोखू शकत नाही. दि.23 तारखेला माननीय विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस संतप्त ,घशाला कोरड पडलेल्या, अद्यापपर्यंत याचना करणाऱ्या जनतेच्या पाणीप्रश्नावर संभाजीनगर च्या रणांगणात जनआक्रोश करीत सरकारला जाब विचारनार आहेत .तहानलेल्या जनतेला मायबाप सरकार पाणी देता का पाणी ? .. संतप्त जनतेला पाणी देऊन, पहा कुणाला जमतंय का थांबवणं .

" रोक सके तो रोको, मगर पाणी दे कर ! लाठी दंडा चलाके नहीं ! "

-व्यंकटेश कमळू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या