💥देव दर्शन करून परत येत असतांना उभ्या असलेल्या ट्रेलरला कारची धडक, २ ठार ५ गंभीर जखमी....!


💥वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकली एर्टिगा कार💥 

फुलचंद भगत

वाशिम:-देवदर्शन करुन परत येत असलेल्यावर काळाने घातला असुन ऊभ्या ट्रेलरला कारची धडक लागल्याने या अपघातात दोनजन ठार तर पाचजन जखमी झाल्याची दुर्देवी घडना घडली आहे.


              वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरात रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरला एर्टिगा कार धडकुन झालेल्या अपघातात दोन जण ठार आणि पाच जण  गंभीररीत्या जखमी झाले आहेत. कारंजा शहराजवळील समृद्धी महामार्गालगत  उभ्या असलेल्या ट्रेलरवर राज्यात दर्शनासाठी गेलेले इंगळे कुटुंब नागपूरकडे परतत असतांना त्यांची एर्टिगा कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरवर मागून जोरात धडकली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना बाहेर काढून अमरावतीला उपचारासाठी पाठवण्यात आले, उपचारादरम्यान २ जणांचा मृत्यू झाला असून कारमधील ईतर ५ जखमीवर उपचार सुरू आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या