💥शिवसेनेत निष्ठेला किंमत आहे पैशाला नाही - संघर्ष योध्दा देवा पाटील


💥शिवसेनेत जो झिजतो त्याच सोन होत ज्याला झिजायच माहीत नसत त्याचा कोळसा💥


✍🏻विशेष लेख :-

शिवसेनेत निष्ठेला किंमत आहे पैशाला नाही.तुम्ही किती श्रीमंत आहात तुमच्या जवळ किती दौलत आहे हे शिवसेना पाहत नाही.जात बघून शिवसेनेत पद वाटली जात नाहीत.जो निष्ठावांत व सच्चा शिवसैनिक आहे त्याला शिवसेनेत न्याय हा मिळतोच म्हणून पदाची अपेक्षा कधी करू नका पद आज नाही तर उद्या मिळणार संयम हा सर्वात महत्वाचा आहे..काही लोक इतके उतावीळ असतात कि फेसबूकवर दोन चार पक्षाच्या पोस्ट टाकल्या की लगेच एखादी पोस्ट टाकतात आणि म्हणतात मला पद दिल तरच मी शिवसेनेत राहणार नाहीतर माझा अखेरचा "जय महाराष्ट्र" वैगेरे वैेगेरे...मला असे वाचून एक प्रकारे चीड येते कारण तुम्ही पदासाठी शिवसेनेचे काम करता पद नाही मिळाल म्हणून शिवसेना सोडण्याची भाषा करता हे कितपत योग्य आहे हे असे शेंबडे धंदे करणारे शिवसैनिक नसतात तर बाटगे फुटणारे कावळे असतात ते कधी ना कधी फुटणारच असतात.

शिवसेनेत जो झिजतो त्याच सोन होत ज्याला झिजायच माहीत नसत त्याचा कोळसा होतो.शिवसेनेसाठी झिजत रहा पदाची वा खुर्चीची कधीही पर्वा करू नका एक दिवस ती खुर्ची तुमच्या दारासमोर उभी असेल.आजकाल काही लोकांना आयता मलीदा खायची सवय लागली आहे शिवसेनेत आयाराम गयारामांना जास्त किंमत दिली जात नाही हे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या कार्यकिर्दीपासून आलेली परंपरा आहे.

वाघासारख जगायच असेल तर शिवसेनेत या लाचार बनून दुसर्याच्या ताटातल उष्ठ खायच असेल तर शिवसेनेत कधीच येऊ नका.शिवसेनेत मर्द मावळ्यांना किंमत दिली जाते लाचारांना शिवसेनेच्या दुनियेत अजिबात स्थान दिले जात नाही.चार पक्ष बदलणारे शंभर कुत्रे सांभाळण्यापेक्षा फक्त ४ असे शिवसेनेचे वाघ सांभाळा जे शंभर कुत्र्यांना भारी पडतील..तुमच्या जवळ किती कार्यकर्ते आहेत याला किंमत नाही तुमच्या जवळ किती निष्ठावांत कार्यकर्ते आहेत याला किंमत आहे.

पैशे फेकल्यावर १०० काय १००० लोक मागे येतात पण असे १००० काही कामाचे नसतात जे आज तुमच्याकडे आहेत उद्या दुसर्या पक्षात दिसतात मनी ध्यानी फक्त शिवसेना पाहिजे.बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक बनून आम्हाला जगायच आहे बाकी सारी मोहमाया आहे ही काही काळापुरती क्षणीक आहे..शिवसैनिक आजन्म टिकणार पद आहे जे तुम्ही मेलात तरी पुसणार नाही.

जय महाराष्ट्र,आपला संघर्ष योध्दा देवा पाटील परभणी विधानसभा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या