💥शहरातील कृषी नगर येथे प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा स्थापन💥
परभणी - प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी शहर प्रमुखपदी मागील अनेक दिवसापासून पक्षात सक्रिय काम करणारे धर्मेंद्र तूपसमुद्रे यांची परभणी शहराच्या शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते धर्मेंद्र तूपसमुद्रे यांना देण्यात आले.
आजच्याच दिवशी परभणी शहरातील कृषी नगर येथे प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा स्थापन करण्यात आली. शाखेच्या नामफकलाचे अनावरण प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कृषी नगर शाखा कार्यकारणी खालील प्रमाणे -
शाखा प्रमुख - संदीप नरवाडे
उपशाखा प्रमुख - सुदाम मस्के
शाखा सचिव - रमेश काळे
शाखा उपसचिव - वैजनाथ जाधव
कोषाध्यक्ष - पंढरीनाथ जाधव
शाखा संघटक - ज्ञानोबा गिराम
शाखा सदस्य - दिगंबर गायकवाड, नागसेन खरात, विजय काचोळे, राजकिरण काचोळे
शाखा नामफलक कार्यक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, वाहतूक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, शहर चिटणीस वैभव संघई, सर्कल प्रमुख श्याम भोंग, शेख बशीर यांच्या सह परिसरातील नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या