💥शहरातील तुंबलेल्या नाल्या सर्वत्र साचलेले कचऱ्यांचे ढिगार देत आहेत धोक्याचे संकेत : नगर परिषद प्रशासन निद्दीस्त💥
पुर्णा (दि.२२ मे २०२२) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या निश्क्रीय कारभाराचा जबरदस्त फटका दरवर्षी शहरातील नागरिकांना सोसावा लागतो मान्सुनपुर्व शहरातील विविध भागातून वाहणाऱ्या लहाण मोठ्या नाल्यांसह शहरातील विविध परिसरात साचलेल्या डोबकाडांसह कचरा व घाणीची वेळीच वाट लावण्याची सद्बुध्दी नगर परिषद प्रशासनाला सुचत नसल्यामुळे शहरात मलेरीया काविळ टायफाईडसह डेंग्यूची साथ मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शहरातील स्वच्छतेवर कोट्यावधी रुपयांचा कागदोपत्री खर्च दाखवून शासकीय निधीची उधळण करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाने जिल्हा परिषद प्रशासन तसेच जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या आदेशाची वेळीच अंमलबजावणी करून शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवून साथींचे आजार फैलावणार नाही याकरीता वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
शहरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या आनंद नगर,आदर्श कॉलनी,अमृतनगर,बोर्डीकर प्लॉटींग,महाविर नगरसह भारतीय स्टेट बँक परिसर,जुना मोंढा,अजिज नगर,पोलिस कॉर्टर परिसर,गवळी गली,जिल्हा परिषद कन्या शाळा परिसर,मस्तानपुरा,मस्तानपुरा नवी आबादी,दत्तनगर,बुध्दीस्वामी मठ संस्थान परिसर,स्वस्तिक नगर भगतसिंघ चौक,डोबी गल्ली,अण्णाभाऊ साठे नगर,भिम नगर,कोळीवाडा,धनगर वाडा,कुंभार गल्ली,अशोक रोड,स्वामी दयानंद सरस्वती चौक,पंचशिल नगर,हरिनगर,कावशी हनुमान मंदिर परिसर,रमाई नगर आदी परिसरांतून वाहणाऱ्या छोट्या मोठ्या नाल्यांची मान्सुनपुर्व अर्थात पावसाळा लागण्यापुर्वी साफसफाई न झाल्यास पावसाळ्यात शहरात सर्वत्र नाल्यांचे पाणी नागरी वसाहतींमध्ये घुसून परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढून मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी मलेरीया,टायफाईड,गॅस्टो,डेंग्यू,काविळ सारख्या साथीच्या आजारांसह चर्मरोगांचे गंभीर आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील स्वच्छता व सुव्यवस्थेसाठी नगर परिषद प्रशासनाने तिन वर्षासाठी तब्बल ३ कोटी रुपयांचे टेंडर दिले असून ज्या संस्थेने स्वच्छतेचे टेंडर घेतले आहे त्या संस्थेकडून मान्सुनपुर्व अर्थात पावसाळा सुरू होण्यापुर्वी शहरातील सर्वच छोट्या मोठ्या नाल्यांसह शहरातील विविध भागात साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगारांची साफसफाई तात्काळ करून घ्यावी नसता शहरात साथीचे आजार फैलल्यास यास सर्वस्वी नगर परिषदेचे प्रशासक सुधीर पाटील व मुख्याधिकारी अजय नरळे हेच जवाबदार राहतील....
0 टिप्पण्या