💥जिंतूरात कचऱ्याचे विलगिकरन नाही : जाहिराती मात्र झळकत आहेत...!


💥केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेच्या लाखो रुपयांच्या निधीची केवळ जाहीरातबाजीतून विल्हेवाट ?💥

जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी. रामपूरकर

जिंतूर नगर परिषदे तर्फे सर्व्हेक्षण 2022 असे मोठे फलक लावून शहरभर जाहिरात केली जात आहे प्रत्यक्षात मात्र कचऱ्याचे कोणतेही विलगिकरण करताना दिसून येत नाही.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजने अंतर्गत लाखो रुपये खर्च करून स्वछता राहण्यासाठी अनेक उपाय केले जात असून जिंतूर नगर परिषद  कडून मात्र मोठे होर्डिंग लावून सर्व्हेक्षण 2022 मध्ये कचऱ्याचे विलगिकरण करा ओला कचरा व सुका कचरा आणि जैविक कचरा स्वतंत्र जमा करा 

परंतु जिंतूरात मात्र ठरवून   दिलेल्या सूत्रा नुसार कचरा जमा होत नाही . तर शहरभर कधी-कधी फीरणाऱ्या घंटा गाडीतुन ही सगळा कचरा एकत्रच भरतांना असे चित्र दिसून येते. दवाखान्यातील जैविक कचरा पण एकत्र संकलन केला जातो या बाबत प्रशासकीय अधीकाऱ्यानी लक्ष देण्याची गरज आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या