💥सेनगाव तालुक्यातील साखरा येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धार,कलशारोहन व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता संपन्न...!


💥हिंगोली विधानसभा मतदारसंघातील आमदार तानाजी मुटकुळे यांनी देखील या कार्यक्रमाला भेट दिली💥

शिवशंकर निरगुडे ; हिंगोली

हिंगोली (दि.१३ मे २०२२) जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील साखरा येथे दि 06/05/2022 रोजी पासून साखरा येथील हनुमान मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह ला सुरुवात झाली होती आणि गेला सात दिवस झाले रोज हरिपाठ रामायण कथा कीर्तन आणि हरीजागर गेल्या सात दिवसा पासून साखरा येथे भक्तिमय वातावरन झाले आहे.


आज साखरा येथील हनुमान मंदिर येथे कलशा रोहन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने गावात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली बैल गाडीत कलश ठेवून हि मिरवणूक ढोल ताशा गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली होती गावात महिलांनी घरोघरी रांगोळी काढून प्रत्येक घरोघरी कळशाची पूजा करण्यात आली या वेळी महिलांनी व पुरुषांनी फेटे बांधून गावातून कलश यात्रा काढण्यात आली आणि हि यात्रा सकाळी 7ते दुपारी 12वाजे पर्यन्त काढण्यात आली होती आणि दुपारी 1च्या नंतर संतोष महाराज वनवे बीड यांचे काल्याचे कीर्तन झाले नंतर प्रसादचे आयोजन करण्यात आले होते या कलशारोहन निमित्ताने गावातील सर्व लेकीबाळी गावात आल्या होत्या या मिरवणुकी दरम्यान हिंगोली विधानसभा मतदारसंघातील आमदार तानाजी मुटकुळे यांनी देखिल या कार्यक्रमाला भेट दिली होती गावात ठीक ठीक थंड पिण्यासाठी पाणी तर कोणाकडून नाष्टा देण्यात आला होता आज साखरा नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमली होती अगदी भगवेमय वातावरण साखरा येथे आज पहायला मिळाले आहे या कार्यक्रमाला  पंच कोशीतील अनेक भावीक भक्त हा सोहळा पाहण्यासाठी आले होते 

साखरा येथील हनुमान मंदिराचे काम आत्ता पूर्ण झाले आहे हें मंदिर 71 फूट उंच करण्यात आले आहे आणि आज साखरा येथे 71 किलो वजनाचा कलश बसण्यात आला आहे या कलशाची किंमत अंदाजे 150000 लाख रुपये किंमतीचा आहे साखरा येथील मंदिर चे साखरा येथील प्रतिष्ठट व्यापारी संदीप आप्पा चाकोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे या मंदिराला आणि सभामंडपाला  सुमारे 15 लाख रुपये लागला आहे मंदिरावर कोरीव्ह मूत्याचे आकर्षक असे काम करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या