💥राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेक्षा विजयराव भांबळे यांनी केले होते या कौतुकास्पद उपक्रमाचे आयोजन💥
बी.डी.रामपूरकर :- जिंतूर
बालविवाह ही कुप्रथा मोडून काढण्यासाठी समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा प्रेक्षा विजयराव भांबळे यांनी युवतीसह बालविवाह करणार नाहीत आणि आजू बाजूला होऊ देणार नाहीत आश्या प्रकारे राष्ट्रवादी भवन परभणी येथे आज सुप्रिया ताई सुळे यांच्या साक्षीने शपथ घेतली,
यावेळी आम्ही माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाईच्या लेकी, कोणत्याही परिस्थितीत आम्ही बालविवाह करणार नाहीत. बालविवाह ही कु प्रथा आहे. अशी कुप्रथा बंद करणार आहोत. वयाच्या अठरा वर्षानंतरच विवाह करू बालविवाहामुळे आरोग्यविषयक अडचणी निर्माण होणार असून यामुळे आमचा उज्ज्वल भविष्यकाळ उध्वस्त होऊ शकतो. बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे याची आम्हाला जाण आहे. अशी शपथ माननीय खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांना साक्षी ठेवून घेतली. फुले, शाहू, आंबेडकरांनी आपल्याला समतेचे तत्त्व दिले. कौटुंबिक हिंसाचाराला आळा घालण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सर्वप्रथम कायदा केला, हा आपला बारसा आहे. महाविकास आघाडी सरकारने विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी अतिशय महत्वाचे पाऊल उचलले आहे. याबावत परभणी जिल्ह्यातून देखील चांगला प्रतिसाद मिळेल. परभणी जिल्ह्यात काही बालविवाह झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वांनी आपल्या मुलांचे बालविवाह करू नये, यासाठी प्रत्येकाने शपथ घ्यावी की, मी माझ्या मुलीचा बालविवाह करणार नाही आणि २८ वर्षापेक्षा लहान सुन ही घरात आणणार नाही. असे आवाहन खा. सुप्रियाताई सुळे यांनी केले. यावेळी खा फोजिया खान मॅडम, भावना ताई नखाते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिंतूर तालुका अध्यक्षा मनीषा ताई केंद्रे, सैलूच्या निर्मला ताई लिपणे उपस्थित होत्या.....
0 टिप्पण्या