💥सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्सप्रेस मध्ये प्रवास्याची विसरलेली आणखी एक बॅग मिळाली....!


 💥देवगिरी एक्सप्रेसच्या एस-४ या डब्यात आढळली बॅग💥

औरंगाबाद/जालना (दि.१२ मे २०२२) - परभणी ते जालना असा प्रवास करते वेळी सौ शारदा रामप्रसाद जेथलिया राह जालना यांची नवीन महागड्या साड्या व सौंदर्य प्रसाधन असलेली बॅग देवगिरी एक्सप्रेसच्या एस-४ या डब्यातून औरंगाबाद येथे उतरून घेण्यात आली सौ.जेथलिया यांनी जालना रेल्वे पोलीस हेड कॉन्स्टेबबल बबन शिरसाट यांना दिली यावरून त्यांनी ही माहिती औरंगाबाद रेल्वे पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार वसीम शेख यांना दिली. 

नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये मिळून आलेली बॅग औरंगाबाद रेल्वे पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी हे आलेले होते सोमाणी यांनी रात्र पाळी,आर.आर.कांगणे व मपोशी धरती धावकर यांना सोबत घेऊन बॅग शोधून काढलीही बॅग घेण्यासाठी जेथलिया हे नांदेड मुंबई राज्य राणी एक्सप्रेस ने औरंगाबाद येथे मध्यरात्री येत आहेत व ती त्यांना ताब्यात देण्यात येणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या