💥पुर्णा येथील रेल्वे मराठी शाळेचा स्नेह मेळावा सर्वांसाठी राहणार अविस्मर्णीय....!


💥निवृत्त गुरुजनांसह देशाच्या कानाकोपऱ्यातुन आले होते माजी विद्यार्थी💥 


पूर्णा (दि.१० मे २०२२) - पुर्णा येथील रेल्वे हायर सेकंडरी स्कूल (मराठी मध्यम ) शाळेच्या १९७५ ते २०१० पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा काल रविवारी साजरा करण्यात आला यावेळी सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यां सह आजी माजी शिक्षकही भारावुन गेले.


    शंभर वर्षे जुनी असल्याचा इतिहास असलेल्या पूर्णेतील रेल्वे मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे काल दि ८ मे रोजी आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता सर्व माजी विध्यार्थी शाळेच्या पटांगणात जमा झाले शाळेच्या सर्व माजी शिक्षकांना मुख्य प्रवेशद्वारातून  सन्मानपूर्वक फ्लॅगमार्च करत व्यासपीठावर विराजमान करण्यात आले त्यानंतर मैदानात जमलेल्या सर्व माजी विध्यार्थी रांगेत उभे राहिले व राष्ट्रगीत गाण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी फ्लॅग मार्चची परेड करुन सर्व गुरुजनांना सलामी देण्यात आली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यांमध्ये बसल्यानंतर त्यात्या वर्गात आपण शिकवत असलेल्या विषयाचा  एखादा क्षण आठवुन गप्पा रंगल्या शाळेतील ते अविस्मरणीय दिवस आठवुन सर्वजण बालपणात बुडाले  त्यानंतर लगेच अल्पोपहार घेण्यात आला यानंतर शहरातील सुमन मंगलकार्यालयात पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली दुपारच्या सत्रात सर्व शिक्षकांचा फेटे बांधून शाल श्रीफळ  स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षकांनी आपापले मनोगत व्यक्त केले ज्यामध्ये माजी मुख्याध्यापक वसंत आर मुंढे यांनी आमच्या जीवनाची खरी कमाई तुम्ही सर्व विध्यार्थी आहेत आज आमचा सन्मान करून तुम्ही गुरुदक्षिणा दिली असे गौरवोद्गार केले , दिगमाबर धामणगावे सर ,तवर सर , भाले सर, सर ,टी पी मुंढे सर ,कुलकर्णी मॅडम, सोन वलकर मॅडम,राऊत सर , बांगळे वसार,खंदारे सर, पुष्पा कोकीळ मॅडम ,धबाले सर ,मस्तान सर,माळोदे सर,पुराणिक मॅडम आदी  आजी माजी शिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केली ,शिक्षकांचा सत्कार होताच मनोगतापूर्वी  शाळेतील स्वर्गीय शिक्षक व विध्यार्थ्यांना दोन मिनिटे मौन पळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दुपारच्या जेवणानंतर माजी विध्यार्थीनींसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच मनोरंजनासाठी चिठ्ठी काढून इशारे करण्यात आलेले ओळखन्याचा कार्यक्रम घेण्यात आला  मूड फ्रेश करण्यासाठी सर्व विध्यार्थीनीं व शिक्षकांनी बेधुंद डीजेच्या तालावर ठुमके लावले त्यानंतर सायं सहा वाजता समारोप करण्यात आला यावेळी माजी विध्यार्थीनीं एकदुसऱ्यासोबत येथेच्छ गप्पा मारल्या तर अनेक वर्षानंतर भेट झाल्याने ओळखुन न आलेले एकदुसऱ्याला बघुन अवाक झाले न भूतो न भविष्यात अस मेळावा कधी झाला नि होणार असे शब्द निघत होते अंदाजे बाराशे च्या जवळपास आलेल्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांच्या खाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती ज्यामध्ये सकाळी नाष्टा  चहा , दुपारी कोल्ड्रिंक्स ,त्यानंतर दुपारचे जेवण ,पाच वाजता चायनीज  असा जेवणाचा मेनू ठेऊन संयोजक समितीने नियोजन केले होते.कार्यक्रम यश्वीतेसाठी माजी विद्यार्थी कोअर समिती तील सदस्य हर्ष वर्धन बागुल,निलेश धामण गावे  , सुधाकर सोनवणे,सचिन खंडागळे,राजनारायान कणसे ,अनिल अवसर्माल, आनंद गायकवाड, राहुल सोनुले ,आदींनी भाले सर व तवर सर यांच्या मार्गद्शनाखालीच अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या संयोजक समितीचे सर्वांनी आभार मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या