💥पुर्णा तालुक्यातील गौर रोडवर अनैतिक संबंधाच्या संशयावरून जिव घेण्याच्या उद्देशाने २८ वर्षीय धाबा चालकावर चाकु हल्ला....!


💥जखमी युवकावर नांदेड येथील खाजगी रुग्नालयात उपचार सुरू : आरोपी चुडावा पोलिसांच्या ताब्यात💥

पुर्णा (दि.०७ मे २०२२) - पुर्णा-नांदेड राज्यमार्गावरील गौर लगत असलेल्या राॅयल रेस्टारंट या धाब्यावर काम करणाऱ्या महिलेशी यापुर्वीच अनैतिक संबंध असलेल्या एका प्रेम विराने 'दोघात तिसरा अन् समदच विसरा' या विवंचनेत चक्क धाबा मालकाशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून चाकु हल्ला करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि.६ मे २०२२ रोजी मध्यरात्री १२-१५ वाजेच्या सुमारास घडली सदरील घटने नंतर गंभीर जखमी युवकास नांदेड येथील खाजगी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

सदरील घटने संदर्भात आज शनिवार दि.०७ मे २०२२ रोजी घटनेतील जखमी धाबा चालक युवक किरण बालाजी मोरे राहणार आहेरवाडी तालुका पुर्णा याच्या वडीलांनी चुडावा पोलिस स्थानकात हजर होऊन दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले की यशवंतसिंह परदेशी या युवकाने आपला मुलगा किरण बालाजी मोरे यास तुझ्या धाब्यावर कामाला असलेल्या माझ्या प्रेमीकेशी तुझे अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करून जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकु हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची लेखी फिर्याद दिल्यावरून आरोपी यशवंतसिंग मदनसिंग परदेशी वय ३२ वर्षे राहणार पंचशिल नगर पुर्णा याच्या विरोधात चुडावा पोलिस स्थानकात गुरनं ६७/२०२२ कलम ३०७,३४१,५०४,भादवी अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चुडावा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या