💥बहुआयामी चळवळीच केंद्र म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर - प्रा.डाॅ.मुंजाजी इंगोले


💥महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते💥

परळी (दि.०१ मे) - देशातील राजकीय सामाजिक आर्थिक पातळीवर तसेच विषमतावादी वर्ण व्यवस्था नष्ट करण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध पैलूवर बहुआयामी आंदोलनाचे नेतृत्व करून देशात समता प्रस्थापित करण्याचे महान कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बहुआयामी चळवळीचं केंद्रच  असल्याचे मत गंगाखेड येथील संत जनाबाई कॉलेजचे प्रा.डॉ. मुंजाजी इंगोले यांनी व्यक्त केले आहे. ते आज दि. 29 रोजी मौजे कौडगाव घोडा येथे आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

    यावेळी विचार मंचावर वंचित बहुजन आघाडीचे प्रसिध्दी प्रमुख बालासाहेब  जगतकर,  गावचे सरपंच नागनाथ कोपनर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव ॲड.संजय रोडे, वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम साळवे, साहेबराव रोडे, युवा नेते राजेश सरवदे, बाळासाहेब किरवले, तालुका कोषाध्यक्ष राजू भुतके तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष वैजनाथ तिरमले,उपाध्यक्ष भारत निसर्गध यांचेसह सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकिसन कांबळे यांनी केले.

     या कार्यक्रमास कौडगाव घोडा येथील बौद्ध उपासक आणि उपासिका तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या