💥पानकनेरगाव फाट्याजवळ डिव्हायडरला आढळून कारचा भीषण अपघात यात 5 जन गंभीर जखमी....!


💥अपघाताची मालिका सुरूच : आठ दिवसात वेगवेगळ्या दुर्घटनांत तब्बल 9 जणांचा मृत्यू💥

शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली : राष्ट्रिय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच;आठ दिवसात वेगवेगळय़ा अपघातात 9 जणांचा मृत्यू हिंगोली जिल्ह्यात  काही दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच आहे आठ दिवसात जवळपास वेगवेगळय़ा झालेल्या तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या अपघाता मुळे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.


हिंगोली सेनगाव ते रिसोड मार्गावरील २२  मे रोजी रिधोरा फाट्याजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.तर २२ मे रोजी रात्री 10 दरम्यान रिसोड ते सेनगांव पानकनेरगांव फाट्या जवळच डिव्हाडरला आढळून कारचा भिषण अपघात झाला यात पाच जन गंभीर जखमी झाले असून नागरीकांनी तात्काळ हिंगोली रूग्नालयात दाखल केले आहे 

हे प्रवाशी रिसोड वरून नांडेदकडे जात असतांना अपघात घडला  जिल्ह्यातील सर्वच रस्ते नव्याने बनवण्यात आले आहेत, त्यामुळे रस्त्यावर वाहनांचा वेग वाढला आहे. गुळगुळीत रस्त्यामुळे वाहन चालकांचा वाहनवरील ताबा सूटून अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या