💥परभणी जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून 31 मे रोजी चौंडी येथे 'अहिल्या एक्सप्रेस' बस धावणार...!


💥सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या प्रयत्नातून बस सेवा सुरू होत आहे💥


ज्या दिवसाची आपण मागील एक वर्षापासून वाट पाहत आहोत तो दिवस 31 मे हा काही दिवसावर येऊन ठेपला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे अभिवादनासाठी जाणाऱ्या परभणी जिल्ह्यातील अहिल्या प्रेमीची संख्या पाहता मागील आठ दिवसपुर्वी परभणी जिल्ह्याचे विभागीय आगार व्यवस्थापक माननीय मुक्तेश्वर जोशी यांना बस सोडण्याचे निवेदन देण्यात आले होते. या निवेदना कडे जोशी यांनी सकारात्मक पाहिल असून 31 मे रोजी प्रवासी मागणीनुसार 'अहिल्या एक्सप्रेस' बस सोडण्यात येणार असल्याचे पत्र त्यांनी निवेदन कर्त्याना  दिलेले आहे. ही पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येक अहिल्या प्रेमींना कळविण्यात आनंद होतो की परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड ,पाथरी, सेलू, जिंतूर, कळमनुरी ,वसमत ,हिंगोली आदी आगारातून चौंडी येथे बस धावणार आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून बस सुरू होणार आहेत. चोंडी येथे वेळेवर पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त सकाळीं आठ वाजेपर्यंत निघणे आवश्यक आहे. तरी अहिल्या प्रेमींनी सकाळी सहा ते आठ या वेळात जास्तीत जास्त संख्येने आपापल्या बसस्थानकावर जमावे. बस सोडण्याला कसलीही मर्यादा नसून  जेवढे जास्त प्रवासी उपलब्ध राहतील तेवढ्या बस वाढवण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासात सायंकाळी चार वाजता बस परत सुटण्यास प्रारंभ होईल. आपापल्या आगारातून नीघणार्‍या प्रत्येक बसचे बसस्थानकामध्ये जाऊन अहिल्या प्रेमींनी स्वागत करावं. त्या बसच्या ड्रायव्हर कंडक्टर यांचाही सत्कार करावा असे आवाहनही आम्ही करत आहोत. शक्य झाल्यास 'अहिल्या एक्सप्रेस' बस जाणाऱ्या मार्गावरील नियोजित बस थांब्याच्या ठिकाणी बस चे स्वागत करण्यात यावे. सोबत बस सुरू करण्याबाबतचे पत्र जोडलेली आहे.धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक  सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या प्रयत्नातून बस सेवा सुरू होत आहे. त्याचा आम्हा सर्व जिल्हावासीयांना अभिमान आहे

इतर जिल्ह्यातील अहिल्या प्रेमीनीही आपापल्या आगार प्रमुखांशी संपर्क साधून आपल्या गावच्या आगारातून अहिल्या एक्सप्रेस सोडण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन रविकांत हरकल ,राजकुमार दंडवते परभणी यांनी केले असून बस सेवेत अडचन येत असल्यास मो.क्र.9511922000/8411922000 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या