💥राज्य सरकारने 3 मे पर्यंत मशिदी वरील लाऊडस्पिकरबाबत योग्य तो निर्णय घ्यावा...!


💥राज ठाकरे यांचा राज्यातील राज्यातील आघाडी सरकारला इशारा💥

 ✍️ मोहन चौकेकर

औरंगाबाद:--तीन मे पर्यंत राज्य सरकारने व पोलीस प्रशासनने 3 मे पर्यंत मशिदी वरील  लाऊडस्पिकरबाबत निर्णय घ्यावा नाहीतर 4मे नंतर आम्ही बिलकुल ऐकणार नाही असा सज्जड इशारा  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. औरंगाबादेत मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात पार पडलेल्या सभेत बोलताना ते म्हणाले  की, लाउडस्पीकर मशिदींवर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल, तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पठण करू, मोठ्याने वाचू, असं ते पुन्हा एकदा या वेळी म्हणाले  आहेत.


मला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत :- राज ठाकरे

राज ठाकरे पुढे म्हणाले की, ''मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. तशी माझी इच्छा देखील नाही. मुस्लिम समाजाने देखील ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे.'' ते म्हणाले, ''त्या दिवशी माझ्याकडे नाशिकला असताना एक पत्रकार आले, ते मुस्लिम समाजातले होते. ते माझ्या कॅबिनमध्ये आले, ते म्हणाले साहेब मी मुसलमान आहे. मात्र आम्हाला भोंग्यांचा खूप त्रास होतो. माझा लहान मुलगा लाउडस्पीकर लागलं की झोपत नाही. तो आजारी पडायला लागला आणि दरवेळी तो झोपायला आला की, इकडं अझान सुरू होत होती. त्यामुळे माझं मुलं झोपू शकत नव्हतं. त्यानंतर मी त्या मशिदीत जाऊन मौलवींना म्हणालो, तुमच्या भोंग्यांमुळे माझ्या मुलाला झोप येत नाही, त्यानंतर त्यांनी आवाज कमी केला.'

लाउडस्पीकर हा सामाजिक विषय :- राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले, लाउडस्पीकर हा सामाजिक विषय आहे, हा धार्मिक नाही. जर तुम्ही या विषयाला धार्मिक वळण देणार असाल तर त्याच उत्तर धर्मानेच देऊ. आमची इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. महाराष्ट्रामधील शांतता आम्हाला भंग करायची नाही. तशी आमची इच्छा देखील नाही, असं ते  म्हणाले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची  मराठवाडा सांस्कृतिक मंडळात प्रचंड मोठी व रेकार्डब्रेक अशी सभा झाली .  राज ठाकरे यांच्या सभेला प्रचंड अश्या मोठ्या  संख्येनं मनसैनिक व नागरिक उपस्थित होते.  मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान यावेळी गर्दीने खचाखच भरलेले होते व मैदानाबाहेर देखील प्रचंड  संख्येने मनसैनिक व नागरिक उपस्थित होते.  एका अंदाजानुसार ही नागरीकांची संख्या लाखोंच्या वर होती. सभेने लोकांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेची आठवण झाली.  राज ठाकरे यांनी जनतेला संबोधीत करताना इतिहासाची अनेक पानं उलगडली. महाराष्ट्र दिन साजरा करताना महाराष्ट्र नीट समजून घेतला पाहिजे. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, अल्लावुद्दीन खिलजीनं औरंगाबादमध्ये एक लाख लोकं घेवून येतो असं सांगितलं होतं. पण हजार लोकंच होती. इतिहास वाचल्यावर कळतं. औरंगजेबाने जी पत्र पाठवलेली आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व्यक्ती नसून एक विचार आहेत. महाराजांचा विचार समाजात पसरला तर आपलं काही खरं नाही , असं औरंगजेबला  वाटायचं.आज महाराष्ट्र दिन १ मे साजरा करताना महाराष्ट्र नीट समजून घेतला पाहिजे. पण जो समाज इतिहास विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला. त्याच्या पायाखालची जमीन सटकली. म्हणून आपल्याला थोडासा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे की आपण कोण आहोत. आपण मराठी आहोत. आपण महाराष्ट्राचे आहोत. आपण महाराष्ट्र नीट समजून घेतला पाहिजे. असं आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.आजच्या सभेतही राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. माझी दोन भाषणं झाली, काय फडफडायले लागले. शरद पवार म्हणाले राज ठाकरे दोन समाजात भांडण लावत आहेत. पवार साहेब, जाती जातीमध्ये जो भेद करतायेत त्यामुळे महाराष्ट्रात दुही माजत आहे अशी टीका राज ठाकरेंनी शरद पवारांवरती केली आहे. शरद पवार म्हणाले राज ठाकरेंनी त्यांच्या आजोबांची पुस्तकं वाचावित. मी सर्व पुस्तकं वाचली आहेत तुम्ही फक्त तुमच्या फायद्याचे वाचले आहे असे राज ठाकरे म्हणाले.

नेत्यांमुळे महाराष्ट्राची अब्रू वेशीवर :-

राज्यातील नेते सध्या एकमेकांवर आरोप करत आहेत. आई बहिणीवरुन शिव्या देत आहेत. आपण हे सगळं हसण्यावारी घेतोय. या नेत्यांमुळे महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली असं राज ठाकरे म्हणाले.

आपण महापुरुषांच्या फक्त जयंत्या,पुण्यतिथ्या करतोय :-

राज ठाकरे यांनी आपल्या या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना म्हणाले की, शिवराय गेल्यानंतरही औरंगजेबाला भीती वाटत होती. कारण त्याच प्रेरणेवर मावळे लढत होते. आपण आज फक्त जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतोय. "बाबासाहेब म्हणतात ज्या दिवशी या देशातील लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचं भूत येईल त्यादिवशी अवघं जग जिंकू" असं राज ठाकरेंनी सांगितलं.

या पुढे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत सभा :-

राज्यात अनेक प्रश्न आहेत. संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. १० दिवसांतून पिण्याचे पाणी येते. परंतु आजचे जे काही प्रमुख विषय आहे, त्यावर मी बोलणार आहे. खरंतर संभाजीनगरचे/ औरंगाबाद मुळ नाव खडकी होते. खरंतर जो आपला इतिहास विसरतो, त्याचा भूगोल जातो... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या