💥दिल्लीत तीन मजली इमारतीला भीषण आग ; 26 जणांचा मृत्यू....!

 


 💥30 अग्मिशमन गाड्यांच्या मदतीनं आग विझवण्यात यश💥 

✍️ मोहन चौकेकर                                    

नवी दिल्ली :- राजधानी दिल्लीत भीषण आगीचा घटना घडल्याचं समोर आलं आहे. तीन मजली कमर्शिअल कॉम्प्लेक्सला लागलेल्या आगीत 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील ही इमारत आहे.या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कोणी अडकून पडलंय का? याचा शोध घेतला जात आहे. 30 अग्मिशमन गाड्यांच्या मदतीनं आग विझवण्यात यश आलं आहे.

दिल्लीच्या अग्मिशमनदलाचे संचालक अतुल गर्ग म्हणाले, सध्याकाळी दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील या तीन मजली कमर्शिअल कॉम्प्लेक्सला आग लागली. सध्या युद्धपातळीवर ही आग विझवण्याचं काम सुरु असून अद्याप 26 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे तर १० जण जखमी झाले आहेत. आग विझवण्यात आली असून अद्याप बचाव कार्य सुरु आहे....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या