💥हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलिस ठाण्याला डायल क्रं 112 दोन मोटारसायकली दाखल...!


💥पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्या हस्ते गाड्याचे पूजन💥 


शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली : गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे गारीवर आळा घालण्यासाठी व अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी डायल 112 वर संपर्क साधावा असे आव्हान गोरेगाव पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक श्रीदेवी  पाटील.यांनी केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा व अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य शासनाच्या जननी सुरक्षा अभियान अंतर्गत  डायल 112 क्रं च्या   मोटर सायकल वितरण दिनांक 21 मे रोजी हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय एम राकेश कलासागर तसेच सहायक पोलिस अधीक्षक येथील देशमुख उपविभागीय अधिकारी वाखारे यांच्या उपस्थितीमध्ये डायल 112 च्या 26 मोटर सायकलचे वितरण करण्यात आले होते.

 त्याच अनुषंगाने गोरेगाव पोलिस ठाण्याला सुद्धा दोन डायल 112, मोटरसायकली मिळालेल्या आहेत.एक दैनंदिन कामकाजासाठी व हदद्दीतील अनुचित प्रकार घडू नये यासाठी  डायल 112 वर संपर्क साधून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडणाऱ्या  घटनांचा पर्दाफाश करण्यासाठी व अंकुश लावण्यासाठी आता गोरेगाव पोलिस तत्पर असून अनुचित अनुचित प्रकार आला आळा घालण्यासाठी नागरिकांनी 112 वर संपर्क साधून पोलिसांची मदत घ्यावी जेणेकरून हद्दीतील गुन्हेगारी तसेच किरकोळ वाद परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी 112 वर नागरिकांनी संपर्क करावा व विनाकारण डायल 112 वर नेहमीच संपर्क करू नये अशावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले .

यावेळी श्रीदेवी पाटील यांच्या हस्ते डायल 112 मोटरसायकलचे हार घालून पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाती सुपूर्त करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, कांचन मुंढे मॅडम ,वंदना जुमडे मॅडम,पी जे तारे ,एस के गायकवाड, के पी शिंदे,बी झेड गायकवाड,कालवे,खोकले जगताप साहेब उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या