💥पुर्णेत भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी....!

 


💥भगवान महाविर जयंती निमित्त शहरात काढण्यात आली शोभायात्रा💥

पुर्णा (दि.१४ एप्रिल) : संपूर्ण जगाला अहिंसा,दया,क्षमा, शांती,मैत्री अन् जगा आणि जगू द्या असा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती आज गुरूवार दि.१४ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.


शहरातील महाविर नगर परिसरातील भगवान महाविर मंदिर येथून आज गुरूवार दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास भगवान महाविर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली यावेळी या भव्य शोभा यात्रेत सर्वधर्मिय नागरिकांनी सहभाग नोंदवला सदरील शोभा यात्रा महाविर नगर,महात्मा बसवेश्वर चौक,श्रीराम मंदिर,छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी परिसरासह मध्यवस्तीतील विविध भागातून ही शोभायात्रा भगवान महाविरांचा जयघोष करत पुन्हा भगवान महाविर मंदिरात पोहचली. त्या ठिकाणी जैन स्तंभाचे पूजन करण्यात आले. या व्यतिरिक्त पूजन व गुरु भगवंत यांचे प्रवचन तसेच मंदिरात पूजा,अभिषेक महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शोभा यात्रेत शहरातील जैन बांधवांसह नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांचे प्रतिनिधी मा.नगरसेवक संतोष एकलारे,प्रतिष्ठित व्यापारी विशाल चितलांगे,किरण कुल्थे,सुरेश सेन,प्रमोद मुथा,महाविर लोढा,पप्पूसेठ खिवंसरा यांच्यासह सर्वधर्मिय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या