💥औरंगाबाद येथील हरवलेल्या १६ वर्षीय देवेंद्रला शोधण्यात सिडको (एन) पोलिसांना अखेर यश....!


💥पोलिसांनी जवाहर कॉलोनी परिसरातून त्यास शोधून नातेवाईकांच्या स्वाधीन केले💥

23 एप्रिल औरंगाबाद 

औरंगाबाद (दि.२३ एप्रिल) - येथील सिडको (एन)  पोलीस स्थानकात दाखल हरवल्या संदर्भातील तक्रारीतील १६ वर्षीय चि.देवेंद्र दत्तात्रय मिसाळ यांचा शोध लावण्यात सिडको (एन) पोलिस प्रशासनाला अखेर यश आले आहे. 

या बाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अनुसार १६ वर्षीय चि.देवेंद्र दत्तात्रय मिसाळ हा दि.२१ एप्रिल २०२२ रोजी त्याच्या कडून आई चा मोबाइल हरवला त्यामुळे घरी रागावतील म्हणून घरी न जाता भीती पोटी निघून गेला होता

तो आज शनिवार दि.२३ एप्रिल रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास जवाहर कॉलोनी परिसरात असल्याचे कळताच सिडको पोलीस यांनी त्यास पोलीस स्थानकात आणून नातेवाईक यांच्याकडे सुपूर्द केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या