💥पुर्णा-गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस क्षमतेपेक्षा जास्त होणाऱ्या रेती उत्खननामुळे पर्यावरणासह कृषी उद्योगालाही धोका....!


💥रेती उत्खननासाठी जेसीबी यंत्रांचा सर्रास वापर ; उत्खनन स्थळावर जिल्हाधिकारी गोयल ड्रोन कॅमेरे बसवणार काय ?💥 

पुर्णा : तालुक्यातील वाहणाऱ्या गोदावरी-पुर्णा नदीपात्रांतील हजारो ब्रास रेतीचे रात्रंदिवस उत्खनन होत असतांना स्थानिक तहसिलदार व महसुल प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेऊन आपल्या कर्तव्याशी बेईमानी करीत असल्याचे सर्वत्र पाहावयास मिळत असून गोदावरी-पुर्णा नदीपात्रातील तिन रेतीघाटांचा यापुर्वीच फेब्रुवारी २०२२ या महिण्यात लिलाव झाला असून यात पुर्णा नदीपात्रातील मौ.कानखेड रेती घाट लिलावधारक अग्रवाल ट्रेडिंग कंपनीचे मालक अनिल मुन्नालाल अग्रवाल यांनी ७६ लाख ७७ हजार रुपयांना ई-ऑक्शनद्वारे घेतला असून ज्याचे निर्धारीत क्षेत्राचा स.नं.गट नं.३३३,३३२,३३०,३२९,३२४,३२५ असा असून लांबी ६०० मिटर,रुंदी ३० मिटर तर खोली ५५ मिटर इतकी आहे तर मौ.पिंपळगाव बाळापूर हा पुर्णा नदीपात्रातील रेती घाट ई-ऑक्शनद्वारे गणेश बिल्डिंग मटेरीयलचे मालक प्रसाद पांचाळ परभणी यांनी १ कोटी ७५ लाख २५ हजार ८००/- रुपयांना खरेदी केला असून या रेती घाटाचे लगतचे निर्धारीत क्षेत्राचे स.नं/गट नं.१३३,१५०,१५१,१५२,१५३,१५४,१५५,१५६,१९२,१९३,१९४,१९५,१९६,१९७ तर लांबी ८५० मिटर रुंदी ४० मिटर तर खोली ६० मिटर इतकी आहे पुर्णा नदीपात्रातील संदलापूर रेती घाट ई-क्शनद्वारे सुदाम लक्ष्मण माने परभणी या लिलाव धारकाने ९० लाख ४९ हजार ८०० रुपयांना घेतला असून याचे निर्धारी लगतचे स.नं/गट नं.०५ ते १० असे असून रेती साठ्याची लांबी ९०० मिटर रुंदी ३० मिटर तर खोली ४० मिटर इतकी आहे.


तालुक्यातील पुर्णा नदीपात्रातील तिन पैकी दोन घाट यात पिंपळगाव बाळापूर व मौ.कानखेड रेती घाटावर शासकीय नियम व अटींची खुलेआम पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास येत असून संबंधित रेती घाट लिलावधारक ठरवून दिलेल्या क्षेत्रफळा व्यतिरिक्त व ठराविक रेतीसाठ्याच्या दहापट रेती साठ्याचे जेसीबी यंत्राच्या साहाय्याने प्रचंड प्रमाणात उत्खनन करून शासकीय नियम व अटींची स्थानिक महसुल प्रशासन व तहसिलदार टेमकर यांच्या मुक संमतीचे पायमल्ली करीत असल्याचे निदर्शनास येत आहे नैसर्गिक संपत्तीस व पर्यावरणास धोका निर्माण होणार नाही याची सर्व जवाबदारी लिलावधारकाची असते परंतु संबंधित रेटी घाट लिलावधारक वेळोवेळी पर्यावरणास धोका निर्माण करीत असून रेतीची वाहतूक करतांना नियमाप्रमाणे वाहनातील रेती प्लास्टिक पेपरने किंवा ताडपत्रीने झाकने बंधनकारक असतांना खुलेआम या नियमांचे उल्लंघन रेती वाहतूक पासचा सर्रास गैरवापर होत असून शासनाच्या डोळ्यात धुळ झोकून एकाच वाहतूक पासवर दिवसभर रेतीची बेकायदेशीर वाहतूकीसह वाहन क्षमते पेक्षा जास्त रेतीची वाहतूक करीत आहेत शासकीय नियमानुसार रेती लिलावधारकाला भागीदार करता येत नाही परंतु संबंधित लिलावधारकांनी नियमांचा भंग करून या रेती घाटात अनेकांना भागीदार बनवून नियमांचा भंग केल्याचे निदर्शनास येत आहे,नियमानुसार लिलावधारकाने रेती घाटाच्या अर्थात निर्धारीत गटाच्या ठिकाणी फलक लावून उत्खनन क्षेत्राची सिमा निश्चित करून सिमा दर्शविणारे खांब उभारणे अनिवार्य असतांना या नियमांचा भंग करून संपूर्ण नदीपात्रावर हक्क दाखवून नियमबाह्य पध्दतीने जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने प्रतिरोज रात्रंदिवस हजारो ब्रास रेतीचे उत्खनन करून शेकडो वाहनांतून रेतीची नियमबाह्य वाहतूक करून शासकीय नियमावलीवर लघूशंका करतांना दिसत आहेत तर रेती घाट लिलावधारकाने रेतीचे उत्खनन व वाहतूक सुर्योदयापासून ते सुर्योस्तापर्यंत म्हणजे सकाळी ०६-०० ते सायंकाळी ०६-०० वाजेपर्यंत फक्त मनुष्यबळाद्वारे करणे बंधनकारक असतांना संबंधित रेती लिलावधारक रात्रंदिवस एक नव्हे तर अनेक जेसीबी यंत्रांचा वापर करून दररोज हजारो ब्रास रेतीचे उत्खनन करीत रात्रंदिवस या अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास येत असून यास स्थानिक तहसिलदार पल्लवी टेमकर व महसुल प्रशासनाची त्यांना खुली सुट मिळाल्याचे दिसत आहे एकंदर तालुक्यात संबंधित अधिकृत रेटी घाट लिलावधारकांसह अवैध अनाधिकृत रेती घाटाची निर्मिती करून शासकीय गौण खनिज रेतीवर दरोडे घालणारे खादीतील अनेक रेती दरोडेखोर ही उदयास आले असून आपल्या नदीपात्रांच्या काठावरील शेतीचा फायदा घेत अनेकांनी बेकायदेशीर रेती घाटांतून चोरट्या रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून रेती तस्करी सुरू केल्याचे निदर्शनास येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या