💥दिव्यांग व निराधारांच्या पगारीसाठी कमिशन खाणाऱ्या बँक मॅनेजर व कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन करा.....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हा मध्यवर्ती बँक व्यवस्थापकाकडे मागणी💥

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पूर्णा येथे दिव्यांग, निराधार व विविध शासकीय योजनांचा पगारी होत असताना बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने लाभार्थांना ओळख देण्याच्या नावाखाली प्रत्येक लाभार्थ्याकडून ५० / - रु . प्रत्येकी वसूल केले जात असल्या बाबतची तक्रार प्रहार जनशक्ती शाखा पूर्णा यांच्याकडे आली होती. प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष बँकेत जावून पाहणी केली असता अशा प्रकारची वसुली होत असल्याचा पुरावा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये कैद केला व संपूर्ण प्रकरण रंगेहाथ पकडले. यावर बँकेचे मॅनेजर श्री. काळे यांना विचारणा केली असता  वसुली करणारा संबंधित व्यक्ती बँकेचा कर्मचारी नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. जर तो बँकेचा कर्मचारी नाही तर मग बँकेचे २०० कोरे विड्रोल त्याच्या कडे कसे आले व तो बँकेच्या आत बसून लाभार्थ्यांची नावे का पुकारत होता हा पण एक प्रश्न आहे. या बाबत  माहिती घेतली असता संबंधित व्यक्ती बँकेच्या मॅनेजरच्याच आदेशाने १००-२०० विड्राल हातात घेवून स्वतः वसुली करुन विड्रालचे वाटप करतो हे पुराव्यासह सिध्द झाले आहे.


आज या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री. कुरुंदकर यांची भेट घेऊन त्यांच्या कडे रीतसर तक्रार दिली व  संबंधित गैरव्यवहाराबाबतच्या व्हिडीओ क्लीप त्यांच्या मोबाईल क्रमांकावर पुरावा म्हणून पाठविलेले आल्या व गोर गरीब निराधार, दिव्यांग विधवा भगिनी यांच्या पगारीतून ५० / - रुपयांची लाच खाणाऱ्या संबंधित कर्मचारी व यांच्या आशीर्वादाने व भागीदारीने हा गैरप्रकार बँकेत चालू आहे. त्या बँक मॅनेजर व इतर अधिकारी यांची चौकशी करुन त्यांना तात्काळ निलंबित करावे. असे न झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या पध्दतीने धडा शिकवेल व त्यावेळी उदभवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत मुख्य व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँक  जबाबदार असेल असे ही या निवेदनात म्हंटले आहे. पगारीतून ५० / - रुपयांची लाच खाणाऱ्या संबंधित कर्मचारी व यांच्या आशीर्वादाने व भागीदारीने हा गैरप्रकार बँकेत चालू आहे. त्या बँक मॅनेजर व इतर अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांना तात्काळ निलंबित करावे. असे न झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या पध्दतीने धडा शिकवेल व त्यावेळी उदभवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत मुख्य व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँक  जबाबदार असेल असे ही या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, युवा आघाडी तालुका प्रमुख नरेश जोगदंड, पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे, शहर चिटणीस वैभव संघई,गजानन परडे, सिध्देश्वर आगलावे, मंचक कूरहे, शेख बशीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या