📝भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दोन तास वाचन उपक्रम संपन्न....!


💥यावेळी सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले💥


पुर्णा (दि.१३ एप्रिल) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फुकटगाव ता.पूर्णा येथे दोन तास वाचन हा उपक्रम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त घेण्यात आला.सदर उपक्रमाच्या पाठीमागचा उद्देश विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित व्हावे व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्मान व्हावी हा होता.


सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.सदर प्रसंगी शा.व्य.समिती सदस्य श्री नामदेव बोकारे,श्री बंडुभाऊ बोकारे,श्री पांडुरंग बोकारे,श्री तोलाजी बोकारे,मुख्याध्यापक श्री गोविंद नलबलवार सर हे उपस्थित होते.

🌴सर्व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खुपच छान होता ;-

वाचन उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री भागवत शिंदे,श्री विलास बोकारे,श्री आबनराव पारवे व श्रीमती योगिता कुलकर्णी मॅडम यांनी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या