💥आगीत घर जळाल्याने उघड्यावर पडलेल्या कुटुंबीयांच्या व्यथा समाजसेवक सखाराम बोबडे पडेगाकर यांनी ऐकल्या....!


💥खळी येते गावाच्या शेजारी अहिल्यादेवी होळकर नगर याठिकाणी शेत वस्तीमध्ये सोन्नर कुटुंब राहते💥


गंगाखेड प्रतिनिधी

गंगाखेड (दि.२४ एप्रिल) - दोन दिवसापूर्वी तालुक्यातील खळी येथील सोन्नर कुटुंबीयांचे घर आग लागल्याने जळून भस्मसात झाले. या उघड्यावर पडलेल्या कुटुंबियाच्या व्यथा आज रविवार दि.२४ एप्रिल रोजी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन ऐकून घेतल्या.


खळी येते गावाच्या शेजारी अहिल्यादेवी होळकर नगर याठिकाणी शेत वस्तीमध्ये सोन्नर कुटुंब राहते. त्यांचे घर जळाले .घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू कपडे, अन्नधान्य, कापूस ,सोयाबीन आदी जळून खाक झाले . घटनेची माहिती कळताच रविवारी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, राजे मल्हारराव होळकर मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष नारायणराव धनवटे, ज्येष्ठ नेते विक्रम इमडे, सोपान ताटे आदींनी भेट दिली. जळालेल्या संपूर्ण घराची व मालाची पाहणी केली. कुटुंबातील उपस्थित असलेल्या महिला व बालक यांनी आपल्या व्यथा भेट देण्यासाठी आलेल्या सखाराम बोबडे पडेगावकर यांच्यासमोर मांडल्या. घरातील ज्येष्ठ व्यक्ती चा मृत्यू होऊन एक वर्ष पूर्ण होत आल्याने त्यांच्या वर्ष श्राद्ध दोन-तीन दिवसात असल्याने त्यासाठी काही पैसे घरात जमा केले होते ती पैसेही जळून खाक झाल्याचे त्यांनी सांगितले. बोबडे यांनी विविध सेवाभावी संस्था व शासनातर्फे मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या