💥नांदेड येथील प्रतिभा निकेतन महाविद्यालयात “जागतिक पुस्तक दिन” साजरा....!


💥महाविद्यालयातील प्राचार्यासमवेत बारा वेगवेगळ्या प्राध्यापकांनी बारा वेगवेगळ्या विषयावर आपले चिंतन यावेळी मांडले💥

“ग्रंथ व वाचन”या विषयी वाचकांमध्ये आवड निर्माण व्हावी या हेतूने महान इंग्रजी साहित्यिक विल्यम शेक्सपियर यांच्या स्मरणार्थ 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन व जागतिक कॉपीराइट दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक देश आणि शहरे यांच्यामध्ये हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. याचेच औचित्य साधून प्रतिभा निकेतन महाविद्यालयात औपचारिक कार्यक्रमांना हेतुपूर्वक बाजूला ठेवून ग्रंथालय, सांस्कृतीक विभाग आणि भाषा विभागामार्फत "पुस्तकांसवे"हा साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम घेण्यात आला. ग्रंथ आणि वाचन यांच्याशी पूरक असणारे बारा वेगवेगळे उप-विषय यावेळी साहित्यिक गप्पांमध्ये ठेवण्यात आले होते.

महाविद्यालयातील प्राचार्यासमवेत बारा वेगवेगळ्या प्राध्यापकांनी बारा वेगवेगळ्या विषयावर आपले चिंतन यावेळी मांडले ज्यावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली आणि ज्ञानाचे आदानप्रदान करण्यात आले. शेक्सपियर चे साहित्य, कॉपीराइट, लोकसाहित्य, संकल्पना आणि साहित्य, आवडता साहित्यिक, संत साहित्य आणि विविध भाषा, इ-बुक, उद्योजकांची यशोगाथा, संस्कारक्षम पुस्तके, लोकशाहीतील निवडणुका, खुली शैक्षणिक साधने आणि आठवणीतील पुस्तके या विषयांवर चर्चेअंती मंथन करण्यात आले. आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून साकारलेल्या साहित्यिक गप्पांच्या या कार्यक्रमात प्राचार्यासमवेत उपप्राचार्य डॉ. स्वामी, डॉ तांडे, डॉ बाहेती, डॉ हापगुंडे, डॉ. गोस्वामी, डॉ राऊत, डॉ. जी.टी. वाघमारे, डॉ. चालिकवार, डॉ. देशमुख, डॉ. लाठकर या प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. मालविया यांनी आभार मानले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या