💥पुर्णेतील बळीराजा साखर कारखान्याच्या मनमानी कारभारा विरोधान निळा येथील सभासद शेतकऱ्यांनी दिले निवेदन...!


💥सभासद शेतकरी यांना चार ते पाच दिवसात ऊस कापणी साठी मशिन उपलब्ध करून देण्याचा दिला शब्द💥


पुर्णा (दि.३० एप्रिल) - येथील बळीराजा साखर कारखाना प्रशासन ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचा ऊस नेण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून काल शुक्रवार दि.२९ एप्रिल २०२२ रोजी तालुक्यातील निळा येथील उस उत्पादक शेतकऱ्यांनी बळिराज साखर कारखान्याचे शेतकी अधीकारी बोंडे यांच्यासह तहसिलदार पल्लवी टेमकर यांना देखील निवेदन निवेदन देऊन निवेदनात बळीराजा कारखाना प्रशासनाने शेतकऱ्याचा ऊस तात्काळ तोडून नेण्याची मागणी केली कारखाना प्रशासनाने ऊस तात्काळ तोडून न नेल्यास कारखाना प्रशासना विरोधात ऊस उत्पादक शेतकरी आपल्या कुटुंबा सहीत कारखान्या समोर उपोषन करतील असा इशारा देखील निवेदनात शेतकरी बांधवांनी दिला आहे.

यावेळी तक्रारदार शेतकऱ्यांना कारखान्याचे शेतकी अधिकारी बोंडे यांनी सभासद शेतकरी यांना येत्या चार ते पाच दिवसात ऊसतोडी साठी कारखाना प्रशासन मशिन उपलब्ध करून देईल असा शब्द दिला आहे निळा येथील १९ ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक असल्याचे यावेळी कारखाना प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले यावेळी निवेदन देणाऱ्या शिस्टमंडळात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के पिंपरणकर,युवा आघाडी तालुकाप्रमुख नरेश जोगदंड,शहर प्रमुख संजय माऊली वाघमारे सुरेश वाघमारे यांच्यासह निळा येथील ऊस उत्पादक सभासद शेतकरी अनंता सुर्यवंशी ,व्यकटी सुर्यवंशी.गजानन किरडे,सुरेश सुर्यवंशी,नारायण सुर्यवंशी, विठ्ठल सुर्यवंशी,नागेश सुर्यवंशी,वैभव सुर्यवंशी, बालासाहेब सुर्यवंशी,सोपान सुर्यवंशी इत्यादी सभासद बांधव उपस्थित होते..प्रहार तालुका शाखा पुर्णा याच्या वतीने..प्रहार तालुका प्रमुख...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या