💥परभणी जिल्ह्यात आता बोगस अपंग प्रमाणपत्र घोटाळा : अपंगांचे शेकडो बोगस प्रमाणपत्रे वितरीत...!


💥प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांचेच या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खर्‍या अपंगांच्या जागेवर अतिक्रमण ?💥

💥सामाजिक कार्यकर्ते पवन कुटकरी यांचा प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांवरच आक्षेप : उपोषणाचा दिला इशारा💥

परभणी (दि.२३ एप्रिल) : परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र वितरणात मोठे रॅकेटच कार्यरत असून या रॅकेटने आतापर्यंत लाखो रुपये उकळून शेकडो अपंगांचे बोगस प्रमाणपत्र वितरीत केले असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते पवन कृष्णा कटकुरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या तपशीलवार निवेदनाद्वारे केला आहे. विशेषतः परभणीच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनीच या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खर्‍या अपंगाच्या जागांवर अतिक्रमण केले असल्याचा गंभीर आरोपही कटकुरी यांनी केला आहे.

        राज्यात महाविकास आघाडीची सरकार अस्तित्वात आल्यापासून शासना अनेक विभागात अक्षरश: भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. विधी द्वारे स्थापित नियम डावलून एक समांतर भ्रष्टाचाराची कार्यपध्दती प्रत्येक विभागात स्वातंत्ररित्या कार्यान्वित आहे. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्थि रुणालयाकडून निर्गमित करण्यात येत असलेल्या अपंग प्रमाणपत्राचे वितरण हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे कटकुरी यांनी या निवेदनात म्हटले असून 30 हजार से 3 लाख रुपयापर्यंत लाच देण्याची कुवत असलेल्या कोणत्याही सदृढ नागरीकांना अपंग प्रमाणपत्रे वितरीत केली जात असल्याचा आरोपही केला.

        सदर प्रमाणपत्र निर्गमित करणार्‍या समितीमधील डॉक्टर, सदस्य, जिल्हा सामान्य रुग्णालय, ऑपरेटर पदावर कार्यरत कर्मचारी व एजन्टच्या सहाय्याने अपंग प्रमाणपत्राची आवश्यकता असलेल्या नागरीकांना हेरण्याचे काम करून रुपये 30 हजार से 3 लाखापर्यंत या रॅकेटद्वारे पैसा उकळल्या जात आहे.

       तालुका निहाय अपंग पैनलवर न करता जिल्हयाच्या ठिकाणी म्हणजे परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात खुलेआमपणे करण्यात  येत असून विशेष म्हणजे परभणतील सर्व पॅनलमधील डॉक्टरांची लॉगिन, आयडी एकाच ऑपरेटरकडे उपलब्ध आहे. दिव्यांग असणार्‍या रुग्णांची तपासणी करण्याची सुध्दा तसदी न घेता आर्थिक व्यवहार करणार्‍या कोणत्याही सुदृढ नागरीकांना दिव्यांग प्रमाणपत्र बिनदिक्कतपणे देण्यात येत आहे.

मागच्या दोन वर्षातील जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथुन देण्यात आलेल्या प्रमाणपत्राचा डेटा प्रशासनाने जाहीर करावा, अशी मागणी कटकुरी यांनी निवेदनातून केली असून शासकीय नोकरीवर कार्यरत असलेले कर्मचार्‍यांना शारिरीकदृष्ट्या अपंग नसतांना सुध्दा आर्थिक व्यवहार करून प्रमाणपत्रे बहाल केली जात असल्याचा गंभीर आरोप कटकुरी यांनी केला आहे. खर्‍या अपंगांना जाणिवपूर्वक टेंपररी असा अभिप्राय देण्यात येवून अडवणुक करण्याची पध्दती अवलंबविली जात आहे. त्यामुळे खर्‍या अपंगाना त्यांच्या परिणाम सोसावा लागत आहे. हा घोटाळा कोटयावधी रुपयांच्या घरात असून यात सामील असलेल्या डॉक्टरांची व ऑपरेटरची संपत्ती तात्काळ चौकशी करून गुन्हे नोंद करण्याची कारवाई करण्यात यावी. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र समितीवर असलेल्या डॉक्टरांच्या पॅनलवर याआधी लाच प्रतिबंधक विभागाने लाच घेतांना अटक केलेल्या डॉक्टरांनाच हेतुतः नेमणूका देण्यात आल्या आहेत, असेही कटकुरी यांनी निदर्शनास आणून दिले.

           परभणीच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर विद्यमान करत असणार्‍या शिक्षणाधिकारी यांनी अश्याच प्रकारे योगस प्रमाणपत्र मिळवून खर्‍या अपंगांच्या जागेवर अतिक्रमण केले असल्याचा गंभीर आरोप कटकुरी यांनी केला.  दिव्यांग व्यक्तीच्या हक्कासाठी अधिनियम 2016 च्या तरतुदीनुसार राबविण्यात येणार्‍या योजना बोगस अपंगांना बिनदिक्कत मिळत असून सदर 2016 च्या अधिनियमानुसार गाव पातळीवर व तथा तालुका व जिल्हा विभाग स्तरावर नियुक्त दिव्यांग तक्रार अधिकारी केवळ पदे अडवून, निवांत बसले असल्याने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय दिव्यांग प्रमाणपत्र बोगस पद्धतीने वितरीत करणारी साखळी निर्माण झाली आहे आणि त्यांनी कोटयावधी रुपयाचा भ्रष्टाचार पध्दशीर चालु ठेवला आहे, असा आरोप कटकुरी यांनी केला.

          सदर प्रकरणे चालल्या जाणार्‍या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या वितरणाची सखोल चौकशी करून मुख्य हस्तक असलेल्या कॉम्प्युटर ऑपरेटर व पॅनल वरील डॉक्टरांची तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांची सखोल चौकशी करावी, गत दोन वर्षातील परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातून निर्गमित सर्व दिव्यांग प्रमाणपत्राची त्रयस्थ समिती गठित करुन चौकशी करण्यात यावी, तथा परभणी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नेमणुकीची चौकशी करून दिव्यांग प्रमाणपत्र तज्ञाकडुन अहवाल देऊन कार्यवाही करावी, अन्यथा 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनापासुन परभणी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण प्रारंभ करण्यात येईल, असा इशारा कटकुरी यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या