💥आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी अभिनेत्री राखी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी....!


💥अशी मागणी विश्व आदिवासी सेवा संघटनेच्यावतीने जिंतूर पोलीस ठाण्यात एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली💥 

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

अभिनेत्री राखी सावंत यांनी सोशल मीडियावर आदिवासी समाजाबद्दल अंगप्रदर्शनाने बदनाम करत असल्याचे व्हिडिओ टाकून आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

सदर प्रकरणी अभिनेत्री राखी सावंत यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट व सायबर क्राईम अॅक्ट  नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी विश्व आदिवासी सेवा संघटनेच्यावतीने जिंतूर पोलीस ठाण्यात एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास आदिवासी सेवा संघटनेच्यावतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

या निवेदनावर आदिवासी सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बागुल, परभणी जिल्हा अध्यक्ष डॉ.देवराव कराळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भतेश पाडवी, परभणी जिल्हा सदस्य शिवाजी साबळे आदींच्या सह्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या