💥सेनगाव तालुक्यातील खडकी येथील रोहित्र जळल्यामुळे गेल्या आठ दिवसा पासून गाव अंधारात....!


💥विद्यूत पुरवठा नसल्यामुळे पाणी प्रश्न गंभीर💥 

शिवशंकर निरगुडे : हिंगोली प्रतिनिधी 

सेनगाव तालुक्यातील खडकी येथील रोहित्र गेल्या आठ दिवसा पासून जाळल्यामुळे गावठाण गेल्या आठ दिवसा पासून ग्रामस्थाना उकाड्याचा त्रास सहन करावा  लागत आहें आत्ता उष्णतेने जिव्हाची लाही लाही होत आहें आणि गावात विद्यूत पुरवठा बंद असल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहें राणावनातून ग्रामस्थाना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहें गावातील काही ग्रामस्थाच्या विज बिल थकबाकी मुळे पूर्ण गावास वेठीस धरले आहें.

जोपर्यंत विज बिल वसुली होत नाही तो पर्यन्त रोहित्र मिळणार नाही असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना कडून सांगण्यात येत आहें महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सक्क्तीची वसुली केली जात आहें असा आरोप सरपंच एकनाथराव हराळ यांच्या कडून केला जात आहें गेल्या अनेक वर्षा पासून सेनगाव येथील इंजिनयर वडगावकर हें एकाच ठिकाणी कार्यरत असल्यामुळे ते अनेक गावाकडे लक्ष देखिल देत नाहीत त्यामुळे त्याची बदली करण्यात यावी अशी मागणी देखिल ग्रामस्थांकडून केली जात आहें येत्या एक दोन दिवसात जर खडकी येथील रोहित्र आला नाही तर हिंगोली येथील जिल्हाअधिकारी यांच्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा खडकी येथील सरपंच एकनाथराव हराळ व गावातील ग्रामस्थाच्या वतीने देण्यात आला आहें.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या