💥परभणीत शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने ईद निमित्य गोरगरीब व गरजूनां कपडयाचे वाटप...!


💥या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शांतिदूत सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते💥                     

परभणी (दि.२९ एप्रिल) - येथील शांतिदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने ईद सणानिमित्य गोरगरीब  व्यक्तिच्या घरी सण आनंदाने साजरा व्हावा या उद्देशाने 150 गरजू व्यक्तिना साड़ी व कपडयाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शान्तिदूत सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर , पोलिस उपअधिक्षक अविनाशकुमार,प्राचार्य बाळासाहेब जाधव, प्राचार्य सुरेश नाईकवाडे,डॉ.दिनेश भूतड़ा,सुरेंद्र सोमाणी,सौ.वर्षा सारडा ,रतन घाडगे पाटील उपस्थित होते. 


या वेळी बोलताना अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी   शांतिदूतच्या या  उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की अश्या कार्यक्रमामुळे  समाजात एकोप्याचा संदेश जातो . आज धार्मिक वातावरण दूषित होत असताना  शांतिदूत ने पुढाकार घेऊन मुस्लिम समाजातील गोरगरीब जनतेसाठी  हा कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधीलकी जपली आहे व भाईचारा संदेश दिला आहे . पोलिस उपअधीक्षक अविनाश कुमार यांनी  या वेळी बोलताना आज सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयन्त होत असताना शांतिदूत चा हा कार्यक्रम दोन समाजाला एकत्र आणणारा आहे . इतर समाज हा ईद निमित्य आपल्या मदतीला येतो ही भावना मुस्लिम समाजामध्ये सुरक्षितता निर्माण करणारी आहे . सर्वानी एकोप्याने व आनंदाने रहावे असे आवाहन त्यानी या वेळी केले . 150 स्त्री पुरुषांना या वेळी साड़ी व कपडयाचे  वाटप करण्यात आले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेजल सारडा ,करन सारडा,हिरा कांची,मिर्झा शोएब,मिर्झा इब्राहिम यांनी विशेष परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या