💥जितूर येथील जालना रोडवर घराला आग लागून तीन संसार उध्वस्त : मुलीच्या लग्नासाठी आणलेला बसताही जळून खाक...!


💥आगीत तिन कुटुंबाचे तब्बल ५ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान💥 

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर

जिंतूर पासून 2 की मी अंतरावर जालना रोडवर राहणाऱ्या तीन कुटुंबीयांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानी बाबत पंचनामा करण्यासाठी जिंतूर तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या आदेशाने जिंतूर मंडळ अधिकारी विजय माणिकराव बोधले व तलाठी नितीन बालाजी बुड्डे यांनी केलेल्या पंचनामा नुसार

सिंधुबाई नारायण गायकवाड यांचे नुकसान ३,१०,००० झाले असून मुलीच्या लग्नाला आणलेल्या कपाट, फ्रिज,पलंग, गादी, कपडे बस्ता, रोख रक्कम व घरगुती साहित्य जळालेली असुन दुसरे कुटुंब शारदा लक्ष्मण लांडगे  १,६०,०००/- ₹  तिसरे कुटुंब शांताबाई यशवंत मोहिते   ९०,०००/-₹ नुकसान झाले आहे, यावेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यावर संजय रामराव आडे, शरद सुदामराव चव्हाण, खुशाल प्रल्हादराव घुगे, पत्रकार शे.रफिक तांबोळी हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या