💥"कोड ऑफ कंडक्ट" च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःला विकसित करावे - प्रा. डॉ.मंजुषा मोळवणे


💥या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव प्रोफेसर डॉ.रामेश्वर पवार हे होते💥

पूर्णा (जं.) कोड ऑफ कंडक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसित करावे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ.मंजुषा मोळवणे यांनी केले.त्या येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील गृहविज्ञान विभाग व गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "कोड ऑफ कंडक्ट" या विषयावरील व्याख्यानात बोलत होत्या.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव प्रोफेसर डॉ.रामेश्वर पवार हे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे यांनी केले.

पुढे बोलताना प्रा. डॉ.मंजुषा मोळवणे म्हणाल्या की  महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी आणि प्रशासकीय पदाधिकारी या सर्वांनीच आपली कर्तव्य पार पाडत असताना सजग असावे.विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात वर्तनाची मूल्य जतन करत असतांना टिंगल - टवाळी करणे छेड काढणे,व्यसन करणे रॅगिंग करणे असे गुन्ह्यास पात्र असते त्यामुळे आयुष्य बिघडू शकते म्हणून

शिक्षकांनी वर्तनाची आचारसंहिता विद्यार्थ्यांना वारंवार सांगितली पाहिजे.   शिक्षक हा आयुष्यभर मार्गदर्शक असतो. नवी पिढी घडविण्याची जबाबदारीही शिक्षकांची असते  म्हणून शिक्षकांनी आचरण आदर्शवत ठेवले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली पाहिजे. कर्मचाऱ्यांची सर्व फाइल्स,कागदपत्रे वेळेवर देणे हादेखील कोड ऑफ कंडक्टचाच भाग आहे.आपापसातील द्वेष,मत्सर,त्रास देणे अजिबात नसावे हे प्रगतीला मारक असते.महाविद्यालय म्हणजे एक संस्था आहे या संस्थेचे चार पीलर म्हणजे विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी असतात यांचा समन्वय असल्याशिवाय आदर्शवत काहीही निर्माण होत नसते म्हणून कोड ऑफ कंडक्टचे पालन करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचेही आपल्या मार्गदर्शनात डॉ. मंजुषा मोळवणे यांनी यावेळी सांगितले.चांगले वागणे- बोलणे,सर्व नियमांचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी असते म्हणून कोड ऑफ कंडक्टचे सर्वांनीच  पालन केले पाहिजे असे मत अध्यक्षीय समारोपात प्रोफेसर डॉ.रामेश्वर पवार यांनी व्यक्त केले. व्याख्यानाचे आयोजन गृहविज्ञान विभाग व गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने करण्यात आले होते.  या व्याख्यानाचे सूत्रसंचालन गृहविज्ञान विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. सुरेखा गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.वैशाली लोणे यांनी मानले.या व्याख्यानाचा लाभ महाविद्यालयातील  प्राध्यापक,कर्मचारी, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांनी घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या