💥वाशिमचे पोलिस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांचे हस्ते सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सत्कार व निरोप समारंभ संपन्न..!


💥सेवा निवृत्त झालेल्या 1 अधिकारी व 7 अमंलदारांचा करण्यात आला सत्कार💥

फुलचंद भगत

मंगरुळपीर:-मा. श्री. बच्चन सिंह जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरुन नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झालेल्या 1 अधिकारी व 7 अमंलदार यांचा दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

                वाशिम जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोउपनि संतोष नेमणार, सपोउपनि हमराज डोंगरे,सपोउपनि मिलींद गोरे, सपोउपनि संजय काळवे, सपोउपनि मोहन पवार, पोहवा गजानन इंगोले पोहवा अरुण मनवर पोनाअशोक इंगळे हे दिनांक 31 मार्च 2022 रोजी त्यांच्या सेवा काळात नियमीत व शिस्तबध्द पणे कर्तव्य निभावुन निष्कलंक सेवा पुर्ण करुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

मा. पोलीस अधिक्षक यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अमंलदार यांनी त्यांच्या सेवाकाळात केलेल्या कामगिरीची प्रशंसा करुन त्यांना शाल, श्रीफळ सन्मान चिन्ह व भेटवस्तु देवुन सन्मानित केले व मा. पोलीसअधिक्षक श्री.बच्चन सिंह यांनी त्यांना व त्यांच्या कुटूंबीयांना सुख समाधान व चांगले आरोग्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. हजर असलेल्या पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मा. पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे,पोलीस निरीक्षक श्री. ब्रम्हदेव शेळके पोलीस कल्याण शाखा हे कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभारप्रदर्शन हे पोलीस निरीक्षक श्री ब्रम्हदेव शेळेके पोलीस कल्याण शाखा, वाशिम यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या