💥गुड फ्रायडे विशेष : गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्वाचा दिवस.ईस्टरच्या आधीच्या शुक्रवारी हा दिन पाळला जातो...!


💥येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले याची आठवण ठेवून जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो💥

✍️ मोहन चौकेकर

भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते.ख्रिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्तीला क्रॉसवर चढवण्यात आले.याची आठवण ठेवून जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो.

काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय दु:खवट्या प्रमाणे साजरा होतो.या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत.या दिवशी भाविक लोक चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर केवळ ३३ वर्ष राहीले,परंतू त्यांनी अखिल मानवजातीला मानवता व शांती चा संदेश दिला. त्यांच्या चांगल्या उपदेशाने लोकांना जीवनाचा खरा मार्ग दिसू लागला. त्यांचा काहीहि दोष नसताना त्यांना मात्र वधस्तंभी देण्यात आले. तरीही ते म्हणाले, "हे प्रभू यांना क्षमा कर,कारण हे काय करतात यांना समजत नाही." वधस्तंभा वरील त्या एका वाक्याने त्यांच्या क्षमे मधील ताकद जगाला प्रदान केली.या वाक्यावर गुड फ्रायडे दिवशी मनन चिंतन केले जाते.

आज जगाला प्रभू येशूनी दिलेल्या संदेशाची गरज आहे.तरच राष्ट्रांतील वैर,दंगली,जाळपोळ, वर्णभेद,जातीभेद,स्वार्थीवृत्ती, मीपणा व अहंकारी वृत्ती संपेल. येशूने मानवजातीला अधिक महत्त्व दिले,जात व्यवस्थेला नव्हे. येशू या जगात जीवन बदलण्यासाठी आले होते,धर्म नव्हे. येशूनी कधीही अंधविश्वासाला थारा दिला नाही तर केवळ सत्यता स्वीकारली.ते सर्व मानवजातीचे आहे व सर्वांचा त्यांच्यावर सारखाच अधिकार आहे.

गुड फ्रायडे निमित्त आपण निर्णय घेवूया की जगात व माझ्या भारत देशात,माझ्या मूळे अन्याय, अशांतता,द्वेष नि अहंकार कधिही पसरू देणार नाही व इतरांनाहि समानतेने जगू देऊ येशूंनी सर्वांना तारणासाठी दिलेल्या बलिदान दिनाचा दिवस म्हणजेच गुड फ्रायडे.जगात एवढे एकच बलिदान आहे ज्याला "गूड" म्हटले जाते..,,

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या