💥वंचित आघाडीच्या मध्यस्थीने आमरण उपोषण स्थगित💥
परळी (दि.३० एप्रिल) - शेताकडे जाणारा रस्ता तात्काळ मोकळा करुन देण्यासाठी आमरण उपोषणास बसले ल्या शेतकऱ्यांचे अमरण उपोषण वंचित बहुजन आघाडीच्या मध्यस्थीने स्थगित.
याबाबत सविस्तर माहिती अशी की काल दिनांक 28 4 2022 रोजी परळी शिवारातील शेतकरी संतोष आदोडे यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश गोविंद जूनाळ सुरेश गोविंद जुनाळ चंद्रकांत गोविंद जूनाळ मोहम्मद हकीमोद्दीन नारायण बाजीराव देशमुख भास्कर न्यानोबा रोडे जगन्नाथ विठ्ठल चव्हाण अश्रुबा सखाराम पवार भगवान विठ्ठल पवार अमोल भास्कर रोडे इत्यादी शेतकरी आपल्या बैल गाडीसह आमरण उपोषणास बसले असता वंचित बहुजन आघाडी च्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा करून व त्यांच्या लेखी आश्वासन नंतर म्हणजेच येत्या आठ दिवसात निकाल देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळेच सदरील उपोषण स्थगित करण्यात आले असून यावेळी उपोषण सोडताना नायब तहसीलदार रुपनर साहेब परळी सजयाचे तलाठी गीते साहेब वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाई आगळे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेंजित रोडे इत्यादीच्या हस्ते लिंबूपाणी देऊन उपोषण सोडवण्यात आले...
0 टिप्पण्या