💥कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंगरुळपीर पोलीसांचे रुटमार्च....!


💥येणाऱ्या सण उत्सवाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रुटमार्चचे आयोजन💥

फुलचंद भगत

मंगरुळपीर:-मंगरुळपीर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनिल हूड,सहाय्यक पो.नि.संतोष आघाव, निलेश शेंबरे सहा पोलीस अधिकारी यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी मंगरुळपीर शहरातून पोलीसांनी मुख्य मार्गावरून पथसंचालन करण्यात आले.


                दि.३ मे रोजी रमजान ईद सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत मुस्लीम धर्मियांचा रमजान महिना सुरु आहे.येणाऱ्या सण उत्सवाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच जिल्हयात 12 मे पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहे मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे 37,(1)(3) च्या प्रतिबंधात्मक आदेशाने सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.मंगरूळपीर शहरातील मानोरा चौक, जयस्तंभ चौक, पोलीस चौकी जवळून दर्गाह चौकातून राजस्थानी चौक, नासरजंग चौक, मार्ग बिरबल नाथ मदीरा जवळून व्हीडीओ चौक, अकोला चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरून पोलीस स्टेशन च्या आवारात पंथसंचालनाची सांगता झाली.या पथसंचालनात यशवंत केडगे उपविभागीय पोलिस अधिकारी मंगरुळपीर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनिल हुड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आघाव, निलेश शेंबरे सहा पोलीस अधिकारी, अंकूश वडतकर, पीएसआय वाहतूक निरीक्षक, रमेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वारकर, पोलीस कॉन्स्टेबल नारायण शिंदे यांचेसह पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक वाशिम व तीन पोलीस वाहनांचा समावेश होता. सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या