💥धनुर्विदया नॅशनल चॅम्पीयनशिप जम्मु काश्मीर २०२२ मध्ये वाशिम जिल्ह्याचे नावलौकीक...!


💥भाग्यश्री बल्लाळ यांनी कम्पाउंड ५० मीटर या खेळात रौप्य पदक भारतीय पोलीस संघाकडुन प्राप्त केले💥

फुलचंद भगत

मंगरूळपीर:-४१ वी सिनीयर ओपन नॅशनल चॅम्पीयन शिप धनुर्विदया स्पर्धा २०२२ दिनांक २१/०३/२२ ते ३०/०३/२२ जम्मु काश्मीर येथे संपन्न झालेल्या स्पर्धामध्ये महाराष्ट्र पोलीस संघा मधुन निवड झालेली वाशिम जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी मपोकॉ/११८८ भाग्यश्री बल्लाळ यांनी कम्पाउंड ५० मीटर या खेळात रौप्य पदक भारतीय पोलीस संघाकडुन प्राप्त केले आहे. मपोकॉ/११८८ भाग्यश्री बल्लाळ हिने पदक पटकावुन वाशिम जिल्हयाचे नाव लौकिक केले आहे.तसेच 1st खेलो इंडीया नॅशनल रॉकिंग धनुर्विदया स्पर्धा २०२२ दिनांक १०/०४/२२ ते १४/०४/२२ टाटा नगर जमशेदपुर (झारखंड) येथे संपन्न झालेल्या स्पर्धामध्ये महाराष्ट्र पोलीस संघा मधुन निवड झालेली वाशिम जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी मपोकॉ/१३८४ रेखा लांडकर यांनी कम्पाउंड ५० मीटर या खेळात रौप्य पदक भारतीय पोलीस संघाकडुन प्राप्त केले आहे. मपोकॉ/१३८४ रेखा लांडकर हिने पदक पटकावुन वाशिम जिल्हयाचे नाव लौकिक केले आहे.

तरी महाराष्ट्र पोलीस दलाचे व अमरावती परिक्षेत्राचे तसेच वाशिम जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकीक केले आहे. या कामगिरी बददल मा. पोलीस अधिक्षक साहेब वाशिम श्री.बच्चन सिंह, तसेच अप्पर पोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे, पोलीस निरिक्षक सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा, श्री. मांगीलाल पवार राखीव पोलीस निरिक्षक,किडा प्रमुख पोलीस नाईक आशिष जैस्वाल तसेच जिल्हयातील अधिकारी/कर्मचारी यांचे कडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाने भविष्यात सुध्दा अशाच प्रकारची भरीव कामगिरी करुन वाशिम जिल्हा पोलीस दलाचे नाव ऊंचाविण्याकरीता प्रोत्साहन दिले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या