💥वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे आयपीएल किकेट सट्टा बुक्कीवर धाड...!


💥या धाडसी कारवाईत ४६ आरोपी विरोधात गुन्हा दाखल : ४ आरोपी अटक,१ लॅपटॉप,८ मोबाईल,२ मोटार सायकल जप्त💥

फुलचंद भगत

मंगरूळपीर:-मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्या पासुन वाशिम जिल्हयातील गुंडा विरूध्द तसेच अवैध धंदया विरूध्द धडक मोहीम हाती घेवुन वाशिम जिल्हयातील गुंड प्रवृतीचे लोकांवर व अवैध व्यवसायीकांवर धडक कार्यवाही करून त्यांच्या मुचक्या आवळल्या व वाशिम जिल्हयातील वातावरण भयमुक्त करण्यावर प्रधान्याने भर दिला आहे.


मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांनी जिल्हयातील अवैध धंदे करणारे व अवैधरित्या क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या इसमा विरूध्द विशेष मोहीम सुरू केली.त्या मोहीमे अंतर्गत दिनांक १६/४/२०२२ रोजी पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,वाशिम यांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीलायक माहीती मिळाली की,रिसोड शहरात आयपीएल २०२२ मधील क्रिकेट सट्टयावर आज दिनांक १६/०४/२०२२ रोजी रिसोड ते सेनगांव रोड वरील संत तुकाराम नगर रिसोड येथे मोबाईल फोनच्या सहाय्याने मुंबई इंडीयन्स विरूध्द लखनउ सुपर जायंटस या सामन्यावर लोकांकडुन मोबाईलव्दारे क्रिकेट मॅच वरील प्रत्येक रन, बॉलींग, बॉटींग यावर पैसे लावुन घेवुन हार जित करीत आहे.अश्या माहीती वरून

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले असता नमुद पथकाने दोन पंचाना बोलावुन त्यांना मिळालेली माहीती देवुन रिसोड ते सेनगांव रोड वरील संत तुकाराम नगरातील विकास अरूण गिरी यांचे राहते घरी गेलो.विकास गिरी यांचे राहते घराचे वरच्या मजल्या वरील बंद खोली मध्ये लाईटच्या उजेडात बसुन चार इसम मोबाईल फोनच्या सहाय्याने मुंबई इंडीयन्स विरूध्द लखनउ सुपर जायंटस या सामन्यावर लोकांकडुन मोबाईल व्दारे किकेट मॅच वरील प्रत्येक रन,बॉलींग,बाटींग यावर पैसे लावुन घेवुन हारजित चा जुगार खेळत व खेळवित असतांना आरोपी नामे १) किरण उर्फ गणेश घनश्याम सिकची वय २४ वर्ष रा.गैबीपुरा रिसोड ता रिसोड जि.वाशिम, २) नरेंद्र देविदास बालाणी वय २७ वर्ष रा गिता नगर एस टी स्कुल जवळ अकोला ह.मु.एकता नगर कृष्णा फलोअर मिल जवळ रिसोड ता.रिसोड जि.वाशिम, जि.वाशिम, ३) साईनाथ संतोष इरतकर वय २६ वर्ष रा.माळी गल्ली रिसोड ता.रिसोड जि.वाशिम, ४) विकास अरूण गिरी वय ३८ वर्ष रा संत तुकाराम नगर रिसोड ता रिसोड जि.वाशिम असे मिळुन आले.त्यांचे कडुन आय पी एल किकेट सट्टा करीता वापरण्यात आले.


१) एक लॅपटॉप,एक पेन ड्राईव्ह, २) वेगवेगळया कंपनीचे ८ मोबाईल , ३) दोन हिशोबाचे रजिष्टर, ४) दोन एक्सटेंशन बॉक्स, ५) दोन मोटार सायकल व नगदी ९५०.०० रू असा एकुण २,६४,९५०.०० रूपये चा मुददेमाल जप्त करण्यात आला.त्यांचे सोबत मोबाईल व्दारे आयपीएल क्रिकेट सट्टयाचे मुख्य सुत्रधार व इतर सट्टा लावणरे आरोपी एकुण ४२ फरार इसमांविरूध्द पो.स्टे.रिसोड येथे कलम ४,५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हया नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. पोलीस अधिक्षक साहेब, वाशिम यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर स्थानिक गुन्हे शाखा हे करीत आहे.

तसेच मा.अपर पोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे यांचे पथकाने दिनांक १२/०४/२२ रोजी पो स्टे मंगरूळपीर -हददीत वरली मटका जुगार अडयावर रेड केली असुन त्यातील फरार आरोपीतांपैकी एकुण १० आरोपीतांची नावे निष्पन्न करुन ०५ आरोपीतांचा शोध घेवुन अटकेची कारवाई करण्यात आली असुन उर्वरीत आरोपीतांचा शोध सुरु आहे.तसेच पोस्टे मंगरूळपीर हददीत स्थानिक गुन्हे शाखा चे पथकाने आयपीएल दि. १२/०४/२०२२ रोजी कारवाई करण्यात आली असुन सदर गुन्हयात फरार असलेले एकुण १२ आरोपीतांचा शोध घेवुन अटकेची कारवाई करण्यात आली असुन उर्वरीत आरोपीतांचा शोध सुरु आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह,अपर पोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, सपोनि अतुल मोहनकर, पोहवा. सुनिल पवार,पोना प्रशांतराजगुरू, राजेश राठोड, पोकॉ निलेश इंगळे, अविनाश वाढे,पोकॉ प्रशांत चौधरी सायबर सेल यांनी सहभाणे नोदंविला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या