💥सेनगाव तालुक्यातील जवळा बु येथे शाळापूर्व तय्यारी मेळावा उत्साहात संपन्न....!


💥यामध्ये पुढील शैक्षणिक वर्षातील नवीन मुलांचे स्वागत मुलांची बौद्धिक,शारीरिक आणि इतर क्षमता तपासणी केली💥

शिवशंकर निरगुडे - हिंगोली प्रतिनिधी 

       जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा जवळा बु ता सेनगाव जि हिंगोली येथे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते, यामध्ये पुढील शैक्षणिक वर्षातील नवीन मुलांचे स्वागत, मुलांची बौद्धिक, शारीरिक आणि इतर क्षमता तपासणी केली गेली.तसेच कोरोना काळात झालेल मुलांचं शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचे विचार विनिमय झाला.


         या मेळाव्याचे उध्दाटन सरपंच सौ शारदा शिवाजी इंगोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.मेळाव्यात लेझीम पथक, बैलगाडीतून मिरवणूक, विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, मुलांचे पहिले पाऊल जतन करण्यात आले.मुलांचे वजन व उंचीचे मोजमाप करण्यात आले. आनंददायी व उत्साही वातावरणामध्ये मेळावा साजरा करण्यात आला.

         याप्रसंगी सरपंच शारदा शिवाजी इंगोले ,राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील  श्री भागवत इंगोले , श्री हरी शिंदे ,संदीप कजबे, मुख्याध्यापक श्री शिंदे सर, श्री भोणे सर, श्री धडवाई सर, श्रीमती देशमुख मॅडम ,श्रीमती जगताप मॅडम ,श्री चव्हाण सर ,श्री जाधव सर ,श्री मेहकरे सर ,श्री गोटे सर, सौ कमलबाई  इंगोले , सौ कांबळे ताई ,इंगोले ताई ,पठाण ताई,काळे ताई ,इंगोले ताई , आदी पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या