💥चारठाणा येथे ईफ्तार पार्टीत सामाजिक एकात्मते चे दर्शन......!


💥यात सर्वसमाजातील समाज बांधवांनी सहभाग नोंदविल्याने सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवुन आले💥

जिंतूर प्रतिनिधी/  बि.डी.रामपूरकर

पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याकरिता सोमवार दि.25 एप्रिल सायंकाळी 6:30 वाजता कांग्रेस कमिटी चे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांच्या वतीने दर्गा मस्जिद मध्ये ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यात सर्वसमाजातील समाज बांधवांनी सहभाग नोंदविल्याने सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवुन आले.

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तसेच वैचारिक समाजाची निर्मिती करण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सदर ईफ्तार पार्टीचे आयोजन प्रत्येक वर्षी नानासाहेब राऊत यांच्या वतीने करण्यात येत असते.परंतु कोरोना पार्श्वभूमीवर दोन वर्षे लाॅकडाऊन असल्याने दोन वर्षे ईफ्तार पार्टी घेता आली नसल्याचे नानासाहेब राऊत यांनी सांगितले या ईफ्तार पार्टीत सर्व समाज बांधवांनी एकत्रित ईफ्तार करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.

याप्रसंगी कांग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, तालुका अध्यक्ष गणेशराव काजळे, सभापती राजेंद्र नागरे, जि.प.सदस्य अविनाश काळे, सरपंच अनिरुद्ध चव्हाण, मुंढे सर,पोलीस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गजानन राऊत, चांदपाशा इनामदार, शेख नासर सदर, इस्माइलखा पठान, इकबालोद्दीन काजी, कासिम इनामदार, नैमोद्दीन काजी, डॉ.टापरे, महेमूद शाह,नासेर देशमुख, , खमर इनामदार, सिद्दीकशाह, पाशा कुरेशी, उपसरपंच वाजेद कुरेशी, शेख आसेफ,समीयोद्दीन काझी,  आबेद देशमुख सय्यद दाऊदअली सय्यद रहेमतअली,अनीस इनामदार, तहेसीन देशमुख, मतीन तांबोळी, शिवशंकर तमशटे,सलाम इनामदार,मंथाया स्वामी, यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या