💥जिंतूर सेलू तालुक्यातील विविध शासकीय योजनेचे अनुदान राष्ट्रीयकृत बँकेतून वाटप करा - माजी.आ.विजय भांबळे


💥माजी आ.विजय भांबळे यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना लेखी पत्राद्वारे केली मागणी💥

जिंतूर प्रतिनिधी बी.डी. रामपूरकर

जिंदर (दि.२८ एप्रिल) - जिंतूर व सेलू तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व शासनायें विविध प्रकारचे राज्यशासन व केंद्रशासनाचे अनुदान हे सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक परभणी मार्फत वाटप न करता राष्ट्रीयकृत बैंक मार्फत लाभार्थ्यांना अनुदानबाटप करण्यासाठी मा आ विजय भांबळे यांनी मा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली.

जिंतुर व सैलू तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व शासनाचे अतिव्रष्टी अनुदान, दुष्काळाचे अनुदान, पीकविमा, पि.एम. किसान योजना, शिक्षक पगार, इतर कर्मचारी पगार, ग्रामपंचागत निधी हि सर्व खाते राष्ट्रीय बँकेकडे वर्ग करण्यात यावे. कारण कि जिंतूर व सेलू तालुक्याचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक परभणीच्या शाखा आहेत त्या शाखेमध्ये मृत असणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान दलाल लोक परस्पर उचलून नेतात, तसेच शासनाचे आलेले अनुदान १५-१५ दिवस देत नाहीत, लाभार्थ्यांना पैसे कमी देणे असे अनेक प्रकार या बँकमध्ये गेली अनेक वर्षापासून घडत आहेत. यामध्ये दलाल लोक सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घेतल्याशिवाय त्यांना अनुदान मिळू देत नाहीत. यामध्ये बँक अधिकारी, राजकीय पुढारी दलाल लोक अशा प्रकारचा भ्रष्टाचार करत आहेत. त्यामुळे जिंतूर- सेलू तालुक्यातील सर्व  लाभार्थ्यांचे खाते राष्ट्रीय कृत बँकेकडे वर्ग करावे जेणेकरून दलाल लोकांचे धंदे बंद करून सामान्य जनतेला न्याय द्यावा, असे पत्रात नमूद केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या