💥स्नेहा सुरेंद्र चव्हाण हत्या प्रकरणात पती सुरेंद्रसह सासू ननंद यांना जन्मठेपेसह प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा...!


💥मृताच्या नातलगांनी निकाला बाबत केले समाधान व्यक्त💥 

पोलिस स्टेशन उदगीर शहर गुन्हा रजिस्टर नंबर 83/2008 कलम 302,498,323,504 भा द वि मधील मयत फिर्यादी स्नेहा सुरेंद्र चव्हाण हिस तिचा नवरा सुरेंद्र भारत सिंग चव्हाण, सासू राजाराणी चव्हाण, ननंद सुधा रुपेश बयास यांनी करणी धरणी साठी जात जुलूम करून दिनांक 6.7.2008 रोजी19-30 वाजता  सुमारासअंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले वगैरे जबाबावरून कलम 307 भा द वि  प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर पीडित महिला 92 टक्के भाजल्याने मयत झाली सदर  गुन्ह्यात उदगीर शहर पोलीस स्टेशन जी लातूर येथील तत्कालीन तपासी अधिकारी  

पिएसआय भगवान एम.धबडगे यांनी कलम 307 व  कलम 302  भादवि प्रमाणे तपास करून माननीय सत्र न्यायालय उदगीर येथे दोषारोप दाखल केले होते .मा. सत्र न्यायालय-क्र 1,उदगीर अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री मनेर साहेब यांनी साक्षीदारांच्या साक्ष व फिर्यादी यांनी मृत्यूपूर्वी दिलेला जबाब  तपास अधिकारी यांनी दाखल केले महत्व पूर्ण पुरावे व त्यांची साक्ष ग्राह्य धरून  नवरा व दोन नणंद अशा 3 आरोपी ना आज दिनांक 26/4/2022 रोजी प्रत्येकाला जन्मठेप व प्रत्येकी 25000/ रुपये  दंड ,एकूण 75000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे सदर खटल्यात सरकार पक्षा तर्फे सरकारी अभियोक्ता श्री .जी .सी .सय्यद यांनी काम पहिले आहे.

सदर खटला त्यावेळी खूप गाजला होता ,या खटल्याच्या निकालाने समाजातील पांढरपेशा लालची लोकांना जरब नक्की बसली आहे मृताच्या नातलगांनी निकाला बाबत समाधान व्यक्त केलेले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या