💥महामानव भगवान बुद्धांचा सम्यक मार्ग मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग आहे ....!


💥भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचे प्रतिपादन💥

पूर्णा (प्रतिनिधी) - दिनांक 16 चैत्र पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळातर्फे जाहीर धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्णा येथील रेल्वे हायस्कूलचे प्राचार्य राम धबाले हे होते.


आपल्या प्रमुख धम्मदेशना मध्ये भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी महामानव तथागत भगवान बुद्धानी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी जो जीवन मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने प्रत्येकाने मार्गक्रमण केले पाहिजे चैत्र पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे निरंजना नदीकाठी वटवृक्षाखाली खडतर अशा प्रकारची तपश्चर्या भगवान बुद्ध करत होते अनेक दिवसापासून अन्नाचा कणही त्यांनी घेतला नव्हता. त्यावेळी त्यांना सुजाता नावाच्या महिलेने त्यांच्यासमोर खिरीचे पात्र ठेवले भगवान बुद्धांनी ती खीर ग्रहण केली व त्यामधून त्यांना नवचैतन्य प्राप्त झाले.

त्यावेळी त्यांच्याही लक्षात आले भूके सारखा दुसरा रोग नाही व त्यावर उपाय म्हणजे पुरेशे अन्नग्रहण करणे संम्यक भोजन शरीराला आणि मनाला कार्य प्रणव करत असते. या वेळी कैलास आनंता  सदर जालना जिल्ह्यातील मंठा येथील उच्चशिक्षित तरुणाने पब ज्या विधी ग्रहण करून श्रा म नेर दीक्षा घेतली भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो व भिक्खू संघाने हा विधी पार पाडला भदंत बोधी धम्मा यांनी  चैत्र पौर्णिमेचे महत्त्व विशद केले.

भदंत पया वंश यांनी आपल्या धम्मदेशना मध्ये महामानव तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणण्याचे आव्हान केले जयंती मंडळामार्फत व्याख्यानमाला वकृत्व स्पर्धा वेशभूषा आदी कार्यक्रम राबवून समाजा समोर नवा आदर्श ठेवला आहे अध्यक्षीय समारोपा मध्ये प्राचार्य राम धबाले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक विचार आत्मसात करून बुद्ध धम्म मधील नीतिमूल्य कारण आचरणात आणावे असे ते अध्यक्षीय भाषणं ना मध्ये म्हणाले.

या कार्यक्रमांमध्ये माधव मोहिते प्रदीप नन्नवरे मंचक खंदारे यांचा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने वेशभूषा वकृत्व स्पर्धा गीत गायन स्पर्धा धम्म ज्ञान स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या विजेत्यांना जयंती मंडळ मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह सर्व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.यासाठी  मंजुषा पाटील उषा गायकवाड मीरा गायकवाड विशाखा येंगडे आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भंते संघ रत्न रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश कांबळे नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड  माजी उपनगराध्यक्ष यादवराव भवरे अशोक धबाले जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश सोनुले सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड नागेश यंग डे  इंजिनिअर पी.जी रणवीर  जयंती मंडळाचे उपाध्यक्ष गौतम वाघमारे साहेबराव सोनवणे राहुल धबाले विजय खंडागळे विजय बगाटे  मुकुंद पाटील विजय जोंधळे भीमा वाहुळे भारतीय बौद्ध महासभेचे एम यु खंदारे शहराध्यक्ष त्र्यंबक कांबळे सचिव अतुल गवळी उमेश बारहटे आदींची टी झेड कांबळे पांडुरंग निर्मले उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका व महिला मंडळाची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या