💥परभणी जिल्ह्यातील रेतीच्या धक्यांची ईटीएसद्वारे तात्काळ मोजणी करा....!


💥राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांची जिल्हा अधिकारी आंचल गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी💥


 
परभणी (दि.२७ एप्रिल) : परभणी जिल्ह्यातील रेतीच्या धक्क्यांवरुन लिलावधारकांनी जेसीबी यंत्राचा वापर करीत अतिरेकी उत्खनन करीत लिलावाच्या मर्यादेपेक्षा जास्त अवैधरित्या वाळूचे उत्खनन केल्या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ ईटीएसद्वारे धक्क्यांची मोजणी करावी व संबंधित लिलावधारकांच्या विरोधात कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून जिल्ह्यातील रेती लिलावधारक व महसुल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या विरोधात यापुर्वी देखील गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी तक्रारी केल्या असतांना देखील जिल्ह्यातील महसुल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाउ केली नसल्यामुळे जिल्ह्यात रेती लिलाव धारकांनी नदीपात्रांत अक्षरशः धुमाकूळ माजवल्याचे दिसत आहे.

       सेलू तालुक्यातील रेती धक्का असलेले मौ.वाघ पिंपरी, मौ.खादगाव, मौ. सोन्ना, मौ. काजळी रोहिणा व परभणी तालुक्यातील जोड परळी येथील वाळूच्या धक्यावरून प्रशासनाने प्रत्येक धक्यात किती वाळूचे उत्खनन केली पाहिजे हे ठरवून दिलेले आहे. निविदा काढते वेळेस मौजे जोड परळी ता.परभणी या वाळू धक्यावरून 7000 ब्रास मर्यादा देलेली आहे. सेलू तालुक्यातील रेती धक्यावरून पुढील प्रमाणे मर्यादा देलेली आहे. मौ. वाघ पिंपरी 200 ब्रास, मौ. खादगाव 2000 ब्रास, मौ. सोन्ना 300 ब्रास, एवढी लिलावाच्या वेळी रेतीचे उत्खनन करण्याची परवानगी दिलेले आहे. हे सर्व धक्के सुरु होऊन अंदाजे एक ते दीड महिना उलटलेला आहे. तरी आजपर्यंत वरील गावातील वाळू धक्यावरून शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादापेक्षा हजारो ब्रास वाळूचे जास्तीचे उत्खनन प्रत्येक धक्यावरून त्या त्या धक्याच्या ठेकेदाराने आजपर्यंत केलेले आहे. आजही उत्खनन चालू आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

        तसेच शासनाचा नियमानुसारबंदी असलेले  जे.सी.बि.पोकलंड, सक्षण पंप (पाण्यातील बोट) या वाहनाचा सर्रास वापर चालू आहे. व त्या ठिकाणावरून टिप्पर वाहनावरून मर्यादेपेक्षा दुप्पट रेतीची वाहतूक केली जात आहे. त्या टिप्परमध्ये साधारणतः सात ते आठ ब्रास रेतीची वाहतूक करत आहेत. तर सामान्य नागरिकांना चढ्या दराने म्हणजेच पाच हजार रुपयेपेक्षा जास्त दराने विक्री करून त्यांची पिळवणूक करीत आहेत. शासनाचे नियम संध्याकाळी सहा वाजल्याच्या नंतर वाळू धक्यावर वाळूचे उत्खनन करू नये, असा नियम असतांनाही रात्रभर सर्रास जे.सी.बि. पोकलंड, सक्षण पंप (पाण्यातील बोट) या वाहनाने वाळू वर काढून टिप्परद्वारे वाहतूक करणे चालू आहे. रेती भरून आलेल्या टिप्पर वाहनांना कुठलेही रॉयलटीची पावती नसतांना हि सर्रास अवैधरित्या रेतीचे चढ्या भावाने विकणे चालू आहे. शासनाने लिलावाच्या वेळेस नियम व अटी मध्ये ठेकेदाराला ई.टी.एस. द्वारे मोजणी करून तो धक्का ताब्यात दिला जातो व ठेकेदारांना वाळूच्या ब्रास मर्यादेपर्यंत उत्खनन करण्यासाठी परवानगी दिली जाते. परंतु जी मर्यादा शासनाने ठरून दिलेली आहे त्या पेक्षा हि हजारो ब्रास बेकायदेशिररीत्या या सर्व ठेकेदारांनी जास्तीचे वाळूचे उत्खनन केलेले आहे.

        त्यामुळे या सर्व रेती धक्याची ई.टी.एस.द्वारे मोजणी करावी नियमबाह्य जास्तीचे उत्खनन केलेल्या ठेकेदाराकडून शासनाच्या नियमाप्रमाणे दंड आकारावा व होणार्‍या दंडाच्या रकमेची वसुली करावी व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार भांबळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली असून सोबत पुरावा म्हणून जेसीबी व पोकलण यांचे नोट कॅमचे फोटोही जोडले आहेत. दरम्यान, यावेळी मौजे वाघ पिंपरी येथील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या