💥परभणी जिल्ह्यात अधिकृत रेती घाटांवर रेती उत्खननासाठी अनाधिकृतपणे जेसीबी यंत्रांचा वापर : जिल्हा प्रशासन निद्रिस्त...!


💥पुर्णा तालुक्यातील सर्वच रेतीघाटांवर नियमबाह्य निर्धारीत रेतीस्थळां व्यतिरिक्त जेसीबी यंत्रांद्वारे रेती उत्खनन💥


💥तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर,संदलापूर,कानखेड रेती घाटांवर ठराविक रेतीसाठ्या व्यतिरिक्त हजारो ब्रास रेतीचे उत्खनन💥 


परभणी :- परभणी जिल्ह्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रांसह अन्य नदीपात्रावरील रेती घाटांचा लिलाव मागील फेब्रुवारी महिण्यात झाला असून यातील लिलावधारकांना महसुल प्रशासनाने रेतीघाट ताब्यात घेण्यापुर्वी व ताब्यात घेते वेळेस एक नव्हे तर तब्बल १०२ नियम व अटी लेखी स्वरूपात ठरवून दिल्या असतांना या नियम व अटी केवळ कागदोपत्रीच सिमीत राहिल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यातील सर्वच रेती घाटांवर महसुल प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन केले जात असतांना जिल्हा महसुल प्रशासनासह स्थानिक तहसिलदार व महसुल प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी संबंधित रेतीघाट लिलावधारकांशी आर्थिक हितसंबंध जोपासत संबंधित रेती घाट लिलावधारकांना रेती उत्खनन व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनात रेती भरण्यासाठी मनुष्यबळाचा वापर नकरता रेती उत्खनन व वाहन भरण्यासाठी रात्रंदिवस जेसीबी अर्थात पोकलेन मशीनचा बेकायदेशीररित्या रात्रंदिवस वापर करण्यास मुकसंमती देत महसुल प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींची दस्तूरखुद्द महसुल प्रशासनच सोईस्कररित्या पायमल्ली करीत शासकीय गौण खनिज रेतीची वाट लावत पर्यावरणासह कृषी उद्योगाला हाणी पोहोचवण्याचा कुटील डाव आखत असल्याचे दिसत आहे.


यात पुर्णा तालुका सर्वात आघाडीवर असून तालुक्यातील पुर्णा नदीपात्रातील पिंपळगाव बाळापूर,संदलापूर,कानखेड या तिन्ही रेती घाट लिलावधारकांनी अक्षरशः धुमाकूळ माजवत रेती घाटांवर तिन ते चार जेसीबी यंत्रांचा वापर करीत ठराविक क्षेत्रासह नदीपात्रातील अन्य क्षेत्रातूनही प्रचंड प्रमाणात रेतीचे उत्खनन करीत शेकडों वाहनांतून हजारो ब्रास अवैध चोरट्या रेतीची जिल्हाधिकारी आंचल गोयल व जिल्हा महसुल प्रशासनाच्या डोळ्यात धुळ झोकत एकाच इन्व्हाईस (रेती वाहतूक पास) वर दिवसातून तिन ते चार वेळेस दिवसरात्र शेकडो हायवा-टिप्पर-ट्रक-ट्रेक्टर द्वारे तस्करी सुरू केल्यामुळे पुर्णा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शेतच कुंपन गिळत असल्याचा गंभीर प्रकार सुरू असल्याचे दिसत असून तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर रेती घाट लिलावधारक प्रसाद पांचाळ,कानखेड रेती घाट लिलावधारक अनिल अग्रवाल आणि सनलापूर येथील रेती घाट लिलावधारकांनी तहसिलदार टेमकर तसेच स्थानिक महसूल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करीत जिल्हा महसुल प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींची पायमल्ली करीत राजरोसपणे जेसीबी मशीनचा वापर करीत रेती घाट लिलावा वेळी ठरवून दिलेल्या रेती साठ्याच्या व्यतिरिक्त हजारो ब्रास रेतीचे उत्खनन करीत अक्षरशः नदीपात्रांवर दिवसरात्र दरोडा घालण्यास सुरूवात केली आहे.


पुर्णा नदीपात्रातील मौ.कानखेड रेती घाट लिलावधारक अग्रवाल ट्रेडिंग कंपनीचे मालक अनिल मुन्नालाल अग्रवाल यांनी ७६ लाख ७७ हजार रुपयांना ई-ऑक्शनद्वारे घेतला असून रेतीसाठ्याची लांबी ६०० मिटर,रुंदी ३० मिटर तर खोली ५५ मिटर इतकी आहे तर मौ.पिंपळगाव बाळापूर हा पुर्णा नदीपात्रातील रेती घाट ई-ऑक्शनद्वारे गणेश बिल्डिंग मटेरीयलचे मालक प्रसाद पांचाळ परभणी यांनी १ कोटी ७५ लाख २५ हजार ८००/- रुपयांना खरेदी केला असून रेतीसाठ्याची लांबी ८५० मिटर रुंदी ४० मिटर तर खोली ६० मिटर इतकी आहे पुर्णा नदीपात्रातील संदलापूर रेती घाट ई-अॉक्शनद्वारे सुदाम लक्ष्मण माने परभणी या लिलाव धारकाने ९० लाख ४९ हजार ८०० रुपयांना घेतला असून रेती साठ्याची लांबी ९०० मिटर रुंदी ३० मिटर तर खोली ४० मिटर इतकी आहे संबंधित लिलावधारक महसुल प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासत पुर्णा नदीपात्रावर अक्षरशः दरोडा घालत असतांना त्यांना पाठीशी घालण्याचा गंभीर प्रकार महसुल प्रशासनातील गेंड्याची कातडी पांघरलेल्या भ्रष्टाचाऱ्यांनी आरंभल्याचे निदर्शनास येत आहे.....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या