💥नांदेड येथील कलावंत तथा फिल्म डायरेक्टर प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट दत्ता तालिमकर मराठवाडा भुषण पुरस्काराने सन्मानीत...!



💥मराठवाडा भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री दत्ता तालिमकर यांचे सर्वस्तरातून होत आहे अभिनंदन💥

नांदेड येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने फुले-शाहू-आंबेडक चळवळी मध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना 'मराठवाडा समाज भुषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन दि.२८ एप्रिल २०२२ रोजी सायं.०५-०० ते रात्री १-०० वाजेदरम्यान तरोडा (बु.) नांदेड येथे बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय महासचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रभारी खा.अशोक जी.सिध्दार्थ हस्ते तथा प्रमुख अतिथी नितीनसिंहजी जाटव प्रदेश प्रभारी,महाराष्ट्र प्रभारी प्रमोदजी रेना,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बसपा ॲड.संदिपजी ताजने,महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बसपा मनीशजी कावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते यावेळी नांदेड येथील प्रसिध्द टॅटू आर्टिस्ट तथा अभिनय कलावंत व फिल्म डायरेक्टर दत्ता आर.तालिमकर यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त 'मराठवाडा समाज भुषण' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी त्यांच्या सोबत अभिनेत्री मोनिका गायकवाड व लेखक सोनु दरेगावकर यांना देखील सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.


नांदेड जिल्ह्यातील कला व अभिनय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट तथा फिल्म डायरेक्टर दत्ता तालिमकर यांनी मी कोण ?,झेंडा,बस्ता आदी सिनेमांसह जवानी म्हाताऱ्याची या मराठी वेब सिरीजसह ॲक्ट्राक्शन या शॉट फिल्मचे  असून त्यांनी स्वतः अभिनय देखील केलेला आहे त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांना 'मराठवाडा भुषण' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आला असून यावेळी त्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी श्री.तालिमकर यांच्यासह अभिनेत्री मोनिका गायकवाड यांचा ही मी कोण ? बस्ता या सिनेमांसह ॲक्ट्राक्शन या  शॉट फिल्म मधूये उत्कृष्ट अभिनय केल्याबद्दल तर उत्कृष्ट लेखक म्हणून सोनु दरेगावकर यांना देखील सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आहे.

मराठवाडा भुषण सन्मान मिळाल्याबद्दल फिल्म डायरेक्टर प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट दत्ता तालिमकर यांचे शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक तथा पत्रकार चौधरी दिनेश,जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स या वेबवृत्त वाहिणीचे संस्थापक चौधरी अजित,नगरसेवक सरदार दिलिपसिंघ सोडी,हुजूरी क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष तथा सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य सरदार मनप्रीतसिंघ कुंजीवाले, प्रसिध्द पंजाबी सिनेकलावंत सरदार तेगबीरसिंघ गिल,जेष्ठ पत्रकार सरदार रविंदरसिंघ मोदी,नांदेड वार्ता वर्तमान पत्राचे संपादक प्रदिपभाऊ नागापुरकर सहसंपादक अविनाश पाटील सर,दैनिक सोलापूर तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश काशिदे सर,राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य सरदार मनबीरसिंघ ग्रंथी,सरदार गुरदयालसिंघ सिद्धू,सरदार हिरासिंघ भट्टी,सरदार मनप्रीतसिंघ कारागीर,सरदार जगदीपसिंघ नंबरददार यांनी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या