💥पुर्णा शहराच्या स्वच्छता मोहिमेत गाढव निभावताय काही अंशी महत्वाची भुमिका : नगर परिषद स्वच्छता विभाग निद्रिस्त...!


💥शहरातील हॉटेलांसह चहाच्या टपऱ्यांकडे गाढवांची धाव : चहा पिऊन फेकलेल्या डिस्पोजरवर मारताय यथेच्छ ताव💥


पुर्णा नगर परिषद प्रशासनाचे शहरातील स्वच्छतेकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना 'मानसा परी गाढव बरी स्वच्छतेसह पोटासाठी गल्ली गल्लीत दारोदारी' अस म्हणण्याची वेळ आली असून रेती तस्करांनी रेती वाहतुकीसाठी पोसलेली बिन पगारी फुल अधिकारी शेकडो गाढव रेती तस्करांनी 'काम सरो वैद्य मरो' या उक्ती प्रमाणे शहरात सोडून दिलेली गाढव शहरातील हॉटेलांसह चहापान टपऱ्यांच्या आसपास फिरून नागरिकांनी चहा पिऊन फेकून दिलेल्या चहाच्या डिस्पोजरांवर ताव मारून तोड गोड करीत स्वच्छ शहर सुंदर शहराची मोहिम राबवत असल्यामुळे नगर परिषद स्वच्छता विभागाचा बराच ताण कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णा नगर परिषदेचे प्रशासक एसडीएम सुधीर पाटील यांचे नगर परिषद प्रशासनाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांची प्रशासनावर पकड नसल्यामुळे नगर परिषद प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी स्वच्छतेसह नागरिकांना अन्य सुविधा पुरवण्यास असमर्थ ठरत असून शहरात जागोजाग तुंबलेल्या नाल्या कचऱ्यांची साचलेली ढिगार यावर मोकाट गाढव अन् डुकरांनी अधिराज्य गाजवण्यास सुरूवात केली असून शहरातील विविध परिसरात गाढव आणि डुकर अगदी बिन पगारी अन् फुल्ल अधिकारी बनून स्वच्छता मोहीम राबवतांना पाहावयास मिळत आहेत.... 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या