💥गौर ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या जल जिवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामा विरोधात जागृक नागरिक सतर्क...!

 


💥ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकाऱ्यांना माहिती देण्या संदर्भात दिला अर्ज ; मागील वर्षी आलेला निधी गायब ?💥


पुर्णा (दि.२० एप्रिल) - तालुक्यातील गौर ग्रामपंचायतीला मागील काळात गावाच्या विकासासह पाणीपुरवठा योजनेसाठी आलेला कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी बोगस व निकृष्ट दर्जाची काम करून तर काही निधी कागदोपत्री गिळकृत करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यामुळे या गावातील काही जागृक नागरिक कमालीचे सतर्क झाले असून यावर्षी जल जिवन मिशन अंतर्गत 'हर घर जल,हर घर नल' या उद्देशाने राज्य शासन व केंद्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला.गौर ग्रामपंचायतीला सुध्दा जल जिवन मिशन अंतर्गत अंदाजे अडीच कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर झाल्याने मागील काळात झालेल्या बोगस कामांप्रमाणे याही वेळेस पाणीपुरवठा योजनेचे विकासकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या गावातील जागृत नागरिक झाले असून सदरील काम अंदाजपत्रका प्रमाणे व उत्कृष्ट दर्जाचे व्हावे याकरिता कमालीचे सतर्क झाले असून या कामाचे अंदाजपत्रक ग्रामस्थांच्या माहितीसाठी तात्काळ देण्यात यावे याकरिता येथील सामाजिक कार्यकर्ते मुंजाजी नागोराव जोगदंड यांनी ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांना लेखी स्वरूपात अर्ज देऊन अंदाजपत्रकाची मागणी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या